शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

जाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा हल्ला, पतीची पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 19:04 IST

Crimenews Kolhapur- घरगुती कारणावरुन चक्क पत्नीनेच पतीवर हल्ला करुन त्याच्या डोक्यात स्टीलचा झरा मारण्याचा प्रकार रामानंदनगरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. या हल्ल्यात पती जखमी झाला असून त्याने रुग्णालयात औषधोपचार घेतले व तडक पोलीस ठाण्याची पायरी चढत पत्नीच्या विरोधात तक्रार दिली.

ठळक मुद्देजाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा हल्ला, पतीची पोलिसात धाव रामानंदनगरात कृत्य, डोक्यात स्टीलचा झरा मारण्याचा प्रकार

कोल्हापूर : घरगुती कारणावरुन चक्क पत्नीनेच पतीवर हल्ला करुन त्याच्या डोक्यात स्टीलचा झरा मारण्याचा प्रकार रामानंदनगरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. या हल्ल्यात पती जखमी झाला असून त्याने रुग्णालयात औषधोपचार घेतले व तडक पोलीस ठाण्याची पायरी चढत पत्नीच्या विरोधात तक्रार दिली.पतीकडून वारंवार मारहाण होत असल्याच्या बहुतांशी तक्रारी पोलीस ठाण्याच्या पाचवीला पुजलेल्या असतातच. त्यामध्ये पत्नीच्या तक्रारीनुसार पतीवर गुन्हा नोंदवले जातात, पण अलीकडे पत्नीकडूनच वारंवार मारहाण होत असल्याच्या पत्नी शिवीगाळ करत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्याच्या संगणकावर नोंद होऊ लागल्या आहेत. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार घडला.

घरगुती कामानिमित्त पत्नी बाहेर गेल्याने ती परतल्यावर तिला तू मला न सांगता कोठे गेली होतीस? असा जाब विचारला. त्यावरुन दोघांत कडाक्याचे भांडण झाले. अखेर पत्नीनेच पतीला शिवीगाळ करत पतीच्या डोक्यात स्टीलचा झरा मारला. या हल्ल्यामुळे पती जखमी झाला, त्याने रुग्णालय गाठले. औषधोपचारानंतर तो थेट करवीर पोलीस ठाण्यात गेला, त्याने पत्नी शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याची तक्रार दिल्याने पोलीसही अचंबित झाले. तक्रारीनुसार पोलिसांनी अखेर पत्नीवरच गुन्हा नोंदवला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर