शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

जे. पी. नाईक यांनी शिक्षणाला दिशा दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:10 AM

उत्तूर : डॉ. जे. पी. नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतले. त्यातून शिक्षणाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. डॉ. जे. पी. नाईक स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.शरद पवार यांच्या हस्ते नामकरण ...

उत्तूर : डॉ. जे. पी. नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेतले. त्यातून शिक्षणाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. डॉ. जे. पी. नाईक स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.शरद पवार यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण, बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पवार यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला.यावेळी शरद पवार यांनी प्रा. किसनराव कुराडे यांच्या ‘बहिरेवाडीचे जे. पी. ते काठीवाडीचे एस. पी.’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. स्मारकाचे बांधकाम करणारे ठेकेदार जयसिंग चव्हाण, रचनाकार संदीप गुरव यांचा सत्कार केला.शरद पवार म्हणाले, डॉ. जे. पी. नाईक यांनी म्हैस व दोन एकर शेतीवर उपजीविका करत चौथीनंतरचे शिक्षण बाहेर घेतले. जागतिक शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या शंभर लोकांमध्ये रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधीनंतर डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव घेतले जाते. त्यांचासारखा मोठा माणूस आपल्या मातीत तयार होऊन जगाला दृष्टी देतो हे महानकार्य त्यांनी केले. शिक्षणाचे सार्वत्रिकरण, प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, महिलांच्या शिक्षणाची काळजी, औद्योगिक क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व याबाबत डॉ. नाईक हे भाष्य करायचे. कोल्हापूरच्या महानगरपालिकेत नोकरीत करीत त्यांनी कोल्हापूर शहराचा आराखडा तयार केला. देशपातळीवर शिक्षणाचे काम करीत असताना कोल्हापूर, गारगोटी येथे विद्यापीठे सुरू केली.कोल्हापूरच्या मातीत अनेक कर्तृत्ववान माणसे शाहू महाराजांच्या विचाराने तयार झाली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाईक यांचे कार्य जनतेला प्रेरित होईल. स्मारकासंदर्भात कै. बाबासाहेब कुपेकर यांचा पाठपुरावा असायचा. आमदार हसन मुश्रीफ यांनी हे काम उत्तम करून घेतले.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, स्मारकासाठी कै. सु. रा. देशपांडे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रा. किसनराव कुराडे यांनी पाठपुरावा केला. उर्वरित कामासाठी निधीची गरज आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम अपुरे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला आले असते तर निधीसाठी विचारणा झाली असती. डॉ. जे. पी. नाईक स्मारकाची देखभाल व दुरुस्ती जिल्हा नियोजन मंडळातून झाली पाहिजे. खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास वाईचे आमदार मकरंद आबा पाटील, माजी आम. श्रीपतराव शिंदे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार भरमू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, वसंतराव धुरे, प्रा. किसनराव कुराडे, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, रामराजे कुपेकर, विष्णुपंत केसरकर, जि. प. सदस्य सतीश पाटील, जयवंत शिंपी, मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, डॉ. नाईक यांचे नातू प्रकाश मंत्री, किरण कदम, चंद्रकांत गोरुले, प्रा. जे. बी. बारदेस्कर, संजय शेणगावे, बी. आर. कांबळे, तहसीलदार अनिता देशमुख, संभाजी तांबेकर, उपसरपंच सुरेश खोत यांनी, तर आजरा पंचायत समितीतर्फे सभापती रचना होलम, उपसभापती शिरीष देसाई, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच अनिल चव्हाण यांनी स्वागत केले. डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी समीर देशपांडे यांनी घेतला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. उपअभियंता कांबळे यांनी आभार मानले.मुश्रीफ निधी आणतीलच्डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी दोन कोटी निधीची गरज असल्याचे आमदार मुश्रीफयांनी सांगितले. यावर पवार म्हणाले, सरकार गमतीशीर आहे. निधी देईल की नाही शंका आहे. पण मुश्रीफ निधी आणल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या कामाचा लौकिक मोठा आहे.शा. ब. मुजुमदार यांचे कौतुकगडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागातून देश-विदेशांत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे पद्मविभूषण डॉ. शा. ब. मुजुमदार यांचा उल्लेख पवार यांनी करून ग्रामीण भागातील व्यक्ती काय करू शकते हे सांगून त्यांनी डॉ. मुजुमदार यांच्या शैक्षणिक योगदानाबाबत कौतुक केले.