टोलनाक्यावर फास्टॅग बसवून घेण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST2020-12-31T04:23:55+5:302020-12-31T04:23:55+5:30
महामार्गावरील टोलनाक्यांवरील गर्दी कमी होऊन वेळ व इंधन बचत व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या दळणवळण खात्याने महामार्गावर ...

टोलनाक्यावर फास्टॅग बसवून घेण्याची लगबग
महामार्गावरील टोलनाक्यांवरील गर्दी कमी होऊन वेळ व इंधन बचत व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या दळणवळण खात्याने महामार्गावर वाहनधारकांकडून टोलनाक्यांवर टोल रोखीने न वसूल करता फास्टॅग प्रणालीद्वारे ऑनलाईन टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे फास्टॅगचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा एक जानेवारीपासून फास्टॅगद्वारे टोल वसुली करण्याचे धोरण राबविण्यात येणार असून, टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनधारकांना फास्टॅगची सक्ती केली असून, फास्टॅग नसणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट टोल आकारला जाणार आहे. या धोरणानुसार किणी (ता. हातकणंगले) येथील टोलनाक्यावरील फास्टॅग प्रणालीद्वारे टोल वसुली करण्यात येणार आहे. वाहनधारकांना फास्टॅग बसविणे गरजेचे आहे, अन्यथा दुप्पट टोलचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. फास्टॅगची सक्ती असल्याने टोलनाक्यावर विना फास्टॅग वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी विविध कंपन्यांचे बूथ सुरू केले असुन, बरेच वाहनधारक फास्टॅग बसवून घेत असल्याचे पाहावयाला मिळत आहे. यासाठी टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला बूथ सुरू आहेत.
.३० किणी
फोटो ओळी .
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी येथील टोलनाक्यावर फास्टॅग बसविणाऱ्या विविध कंपन्यांकडून सुरू करण्यात आलेल्या बूथवर फास्टॅग बसवून घेताना वाहनधारक.