शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

होतं स्वप्न, बाई गं मी बसले वं खऱ्या इमानात; मुंबईच्या कचरा वेचक सुशीला साबळे यांनी केले मन मोकळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:16 IST

'पोटासाठी रस्त्यावरचा कचरा आणि भंगार उचलला'

कोल्हापूर : ‘होतं स्वप्न ते आयुष्य जगण्याचं, बाई गं मी बसले वं खऱ्या इमानात, कोपन हेगन ते चायना, साउथ आफ्रिकेला राहून, जाउन आले मी, त्यात थायलंड-ब्राझीलही होतं’ या गाण्याच्या ओळी सादर करून मुंबईच्या कचरा वेचक सुशीला साबळे यांनी कचरा वेचकांचे मन सर्वांसमोर मोकळं केलं.येथील शाहू स्मारक भवनात गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अवनि संस्था आणि कोल्हापुरातील सामाजिक संस्थांच्या सहभागातून उत्सव पुनर्चक्रीकरणाचा, पर्यावरण संरक्षणाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात साबळे यांचा सन्मान करण्यात आला. ‘कचरा वेचकांचे पुनर्चक्रीकरणामधील योगदान’ या विषयावर त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या, १९७२ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा मराठवाड्यातून मायसोबत मुंबईला गेले. मिळेल त्या जागेवर झोपडी बांधून राहिलो. पोटासाठी रस्त्यावरचा कचरा आणि भंगार उचलला. आज कचरा वेचकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करतेय तरी हे काम थांबवलेले नाही, कारण हे पर्यावरण वाचवण्याचे काम आहे, हे आता मला समजले आहे.थंडी, ऊन, पावसात काम करणाऱ्या या कचरा वेचकांना किमान ओळखपत्र द्या, ग्लोव्हज आणि बूट द्या. प्लॅस्टिकचा कचऱ्यावर पूर्णपणे बंदी घातली तर या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आधी सोडवा. अवनि संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी त्यांची ओळख करून दिली.महिलांनी वाजवल्या टाळ्याया कार्यक्रमात साबळे म्हणाल्या, कोल्हापूर मला खूप आवडले. या कार्यक्रमाची संकल्पनाही आवडली. कचरा वेचक महिलांना कामातून तासभर वेळ काढून त्यांचे वैचारिक प्रबोधन करणे गरजेचे आहे. छान साडी नेसून, नटून-थटून स्वत:साठी वेळ काढला, याबद्दल त्यांचे आणि संस्थेचे अभिनंदन असे म्हणताच उपस्थित कचरा वेचकांनीही टाळ्या वाजवल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईairplaneविमान