शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य, विज्ञान प्रबोधिनीचा निष्कर्ष; पुराची नेमकी कारणे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:40 IST

पुराबाबत अभ्यास आणि उपायांकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : वेळोवेळी केलेला अभ्यास आणि सुचविलेल्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगा नदीला पूर येत असल्याचा निष्कर्ष कोल्हापूरच्या विज्ञान प्रबोधिनी या संस्थेने काढला आहे. या मर्यादित पुराचा स्वतंत्र अभ्यास लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी सोमवारी मेलद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. केवळ अलमट्टीवर खापर फोडून पंचगंगेचा पूर रोखणे अशक्य असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.विज्ञान प्रबोधिनीने गेली तीन वर्षे शासनाकडे पाठपुरावा करूनही यासंदर्भात एकही उपाययोजना झालेली नाही, धरणे रिकामी ठेवा, अलमट्टीमुळेच पूर येतो, अधिकारी अभियंते ऐकत नाहीत असे मुद्दे मांडत यावर्षी पूर येणारच नाही असे ठामपणे मांडणारे जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पंचगंगा नदीच्या पूर आलेल्या पाणलोटात अतिवृष्टी झालेली नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात आजवर केवळ २३४१ मिलिमीटर पाऊस झाला. अलमट्टी धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा असून, ११,४४४५ क्युसेक इतकी पाण्याची आवक आहे. धरण भरायला आणि बॅकवॉटरचा परिणाम होण्यासाठी अवधी आहे. २००५ आणि २०१९, २०२१ चे पूर अधिक काळ राहण्यास आणि वाढ होण्यास अलमट्टी हे कारण ठरले होते. परंतु, केवळ अलमट्टीकडे पूर्ण दोष दाखवून इथला पूर रोखता येत नाही, असे मुद्दे प्रबोधिनीने या पत्रात मांडले आहेत.

पंचगंगेच्या खोऱ्यात सद्या धरणांमधून २८०० क्युसेक इतकेच पाणी विसर्ग सुरू आहे. कृष्णेत पाण्याची नैसर्गिक भिंत तयार झाल्याने पंचगंगेचे पाणी पुढे न सरकण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या वारणा, दूधगंगा, कृष्णा, कोयनेचे पाणीही अद्याप परिणाम करीत नाहीत. कोल्हापुरात साेमवारी पहाटे तीन वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे; मात्र राजाराम बंधाऱ्यानंतर सुर्वे आणि रुई बंधारे वगळता इचलकरंजी इशारा पातळीला पोहोचलेली नाही. शिवाजी पूल, शिरोली पूल आणि इचलकरंजीतील पाणीपातळी उतरलेली दिसते. याचा अर्थ पंचगंगेच्या खोऱ्यात पडलेल्या पावसाचा हा पूर आहे, असे प्रबोधिनीने म्हटले आहे. हा पूर आता का आला?, इशारा पातळी का गाठली? हे शोधणे गरजेचे आहे, दिशाभूल करून पुराची खरी कारणे न अभ्यासणे किंवा लपविणे हे धोक्याचे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पुराची कारणे अशीनद्यांची नैसर्गिक वळणे, नदी आणि धरण क्षेत्रात वाढलेले गाळाचे प्रमाण, नदीपात्रातील बंधारे आणि अतिक्रमणे, बेकायदा पूल व त्याचे भराव, पूरबाधित क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव, खरमाती, कचऱ्याचे ढीग, उसाचे पीक, दरवाजा नादुरुस्त असल्याने, राधानगरी धरणातून वीजघराखेरीज पाण्याचा विसर्ग करता न येणे, खुल्या क्षेत्रातील पाऊस मोजता न येणे, १२ पुलांच्या कमी मोऱ्यांतून पाणी पुढे जाण्यासाठी लागणारा विलंब.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणfloodपूर