शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

शाब्बास!, शिष्यवृत्तीत कोल्हापूर राज्यात भारी; ईश्वरी कोटकर, नुपूर पोवारने पटकावला प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 19:05 IST

उज्ज्वल परंपरा कायम 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली. या दोन्ही गटांमध्ये राज्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी अधिक आहे.पाचवी ग्रामीणमध्ये भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर सोनाळीची विद्यार्थिनी ईश्वरी दिग्विजय कोटकर आणि आठवी ग्रामीणमध्ये राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील श्री नामदेवराव भोईटे विद्यालयाची विद्यार्थिनी नुपूर युवराज पोवार या दोघींनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला. राज्य यादीतील २७ पैकी तब्बल २४ विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत.राज्यस्तरीय गुणवत्तायादीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या ४२२ असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ८० म्हणजे १९ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांतील विद्यार्थी तुलनेत अधिक उत्तीर्ण झाले आहेत. पाचवीची राज्याची टक्केवारी २३.९० टक्के असून, कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी ३६.१० टक्के आहे.आठवीची राज्याची टक्केवारी १९.३० टक्के असून, कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी ३५.८५ टक्के इतकी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. मीना शेंडकर यांनी अभिनंदन केले आहे.

पाचवी ग्रामीण राज्य यादी

  • सौरभी सूर्यकांत डवर, केंद्रशाळा फेजिवडे, ता. राधानगरी (दुसरी)
  • श्लोक शशिकांत पाटील, विठ्ठल विद्यामंदिर पेद्रेवाडी, ता. आजरा (तिसरा)
  • स्वरा आदेश सापळे, विद्यामंदिर सोनाळी, ता. भुदरगड (तिसरी)
  • आदित्य दिगंबर मिसाळ, केंद्रशाळा पिंपळगाव, ता. भुदरगड (सहावी)
  • श्रीष मनोहर मासूरकर, वि.मं. माडवळे, ता. चंदगड (सहावा)

आठवी ग्रामीण राज्य यादी

  • पार्थ चंद्रकांत पाटील, कुमार भवन पुष्पनगर, ता. भुदरगड (तिसरा)
  • अंजली बाबासो. पाटील, छत्रपती शिवाजी हायस्कूल, पन्हाळा (चौथी)
  • यश लक्ष्मण पाटील, छत्रपती शिवाजी हायस्कूल, तिरवडे, ता. भुदरगड (सातवा)
  • पार्थ बजरंग व्हरकट, कुमार भवन, पुष्पनगर, ता. भुदरगड (सातवा)
  • अविष्कार मुकुंद माळी, दत्ताजीराव कदम हायस्कूल, शिरोळ (सातवा)

इयत्ता आठवी शहरी राज्य यादी

  • श्रुती अमित पुंडपळ, व्यंकटराव हायस्कूल, आजरा (दुसरी)
  • श्वेतल सुनील बंडगर, डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल, इचलकरंजी (आठवी)
  • विवेक धनाजी पाटील, व्यंकटराव हायस्कूल, आजरा (आठवा)
  • स्वराज्य प्रवीण निंबाळकर, व्यंकटराव हायस्कूल, आजरा (आठवा)
  • संस्कृती संतोष आवळे, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, इचलकरंजी (दहावी)