‘डीएसके’मधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 14:17 IST2019-02-26T14:16:41+5:302019-02-26T14:17:28+5:30
पुण्यातील डी. एस. के.गु्रपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी विभागीय अधिकारी मावळ पुणे यांचेकडे अर्ज भरून द्यावा, त्याचा नमुना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सूचना फलकामध्ये लावला आहे, असे आवाहन तपास अधिकारी आर. बी. शेडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

‘डीएसके’मधील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार
कोल्हापूर : पुण्यातील डी. एस. के.गु्रपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी विभागीय अधिकारी मावळ पुणे यांचेकडे अर्ज भरून द्यावा, त्याचा नमुना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सूचना फलकामध्ये लावला आहे, असे आवाहन तपास अधिकारी आर. बी. शेडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
बांधकाम व्यावसायिक डी. एस. के. यांच्याविरोधात मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. पुणे व कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत डी. एस. कें.च्या ५०० मालमत्ता सील केल्या आहेत. जिल्ह्यातील ६०० गुंतवणूकदारांनी डी. एस. के. ग्रुपमध्ये २०० कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यांपैकी ३०० जणांनी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.
आतापर्यंत फसवणुकीचा आकडा १९ कोटींचा आहे. या ग्रुपचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी, पत्नी हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष यांच्याविरोधात चार हजार पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी शासन मदत करीत आहे.