शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शेअर ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; सहा संशयितांवर गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: December 4, 2023 18:31 IST

पाच टक्के परताव्याचे आमिष, व्याज अन् मुद्दलही अडकली

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील फॉरेक्स वेल्थ शेअर ट्रेडिंग कंपनीने गुंतवणूकदारांची एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत संजय सॅलो कास्टो (वय ५७, रा. हल्याळ, जि. कारवार, कर्नाटक) यांनी रविवारी (दि. ३) रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फॉरेक्स वेल्थ सोल्युशन कंपनीसह सहा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फॉरेक्स वेल्थ सोल्युशन (स्वानंद कॉम्प्लेक्स, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यासह कंपनीचे संचालक स्वप्नील गजानन माताडे (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), सोनिया विश्वनाथ हत्ते (रा. कुपवाड रोड, सांगली), दीपक शिवाजी गजाकोश (रा. आरके नगर, कोल्हापूर), प्रसाद परशराम सोनके (रा. साधना कॉलनी, गडहिंग्लज) आणि गंगाराम पितांबर दंडी (वय ५०, रा. औरनाळ, ता. गडहिंग्लज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय कास्टो आणि त्यांच्या नातेवाइकांनी १३ मे २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ताराबाई पार्क येथील फॉरेक्स वेल्थ सोल्युशन ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवले. गुंतवलेल्या रकमेवर दरमहा पाच टक्के परतावा आणि पाच टक्के मुद्दल अशी दहा टक्के रक्कम देण्याचा करार कंपनीने गुंतवणूकदारांसोबत केला होता. सुरुवातीचे काही महिने परतावे मिळाल्यामुळे कास्टो यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी बँकांमधून कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून काढलेले पैसे फॉरेक्समध्ये गुंतवले.मात्र, गेल्या वर्षभरापासून परतावे मिळणे बंद झाले. मुद्दलही परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. तक्रार अर्जाची पडताळणी करून फॉरेक्स कंपनीसह सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा शोध सुरू असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी