शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Kolhapur Crime: थांबा..!, अजून तपास सुरु आहे; फिर्यादींची चिंता वाढली

By उद्धव गोडसे | Updated: April 16, 2025 18:35 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : घरफोड्या, चेन स्नेचिंग, बनावट नोटा, अवैध गर्भलिंग तपासणी, गर्भपात, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : घरफोड्या, चेन स्नेचिंग, बनावट नोटा, अवैध गर्भलिंग तपासणी, गर्भपात, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरापासून केवळ तपास सुरू असल्याची उत्तरे पोलिसांकडून फिर्यादींना मिळतात. यामुळे चोरटे मोकाट असून, गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. रखडलेल्या तपासांना गती कधी येणार? असा सवाल फिर्यादींकडून उपस्थित केला जात आहे.या गुन्ह्यांचा तपास रखडलाकरवीर : बनावट नोटा, बोगस खते, कळंबा येथील अवैध गर्भलिंग निदान, फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावे माने दाम्पत्याने केलेली एक कोटी ६७ हजारांची फसवणूक, मांढरे येथील विषबाधा यासह काही घरफोड्यांचा तपास रखडला आहे. घरफोड्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

शाहूपुरी : मध्यवर्ती बसस्थानकातून सराफाच्या दागिन्यांची झालेली चोरी, नागाळा पार्कातील अल्पवयीन मुलीला फूस लावून लुबाडलेले ५२ तोळे दागिने, रुक्मिणीनगर येथील घरफोडी, नागाळा पार्क येथील वाहनांच्या काचा फोडून लांबवलेली रोकड या गुन्ह्यांचा तपास रखडला आहे. जिल्हा परिषदेच्या बनावट धनादेश गुन्ह्यातील एक संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, इतरांचा शोध सुरू आहे.

जुना राजवाडा : भानामती केल्याची भीती घालून गंगावेश येथील वृद्धाची लूट करणारे प्रमुख आरोपी अद्याप पसार आहेत. रंकाळा परिसरातील चेन स्नेचिंग आणि एका घरफोडीचा अद्याप उलगडा झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांत चोरीतील २३ पैकी केवळ ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

लक्ष्मीपुरी, राजारामपुरी : या दोन्ही पोलिस ठाण्यात गेल्या तीन महिन्यांत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या २९ पैकी २७ गुन्ह्यांची उकल झाली, तर राजारामपुरी पोलिसांनी ४५ पैकी ४२ गुन्ह्यांचा छडा लावला. घरफोडी, खंडणी आणि फसवणुकीच्या जुन्या गुन्ह्यांचे तपास मात्र अजूनही सुरूच आहेत.

एकाच चोरट्याकडून १४ गुन्ह्यांचा उलगडास्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या आठवड्यात कसबा बावड्यातील एका चोरट्याला पकडले. त्याच्या चौकशीत १४ घरफोड्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. मंगल कार्यालयातील समारंभांमध्ये चोऱ्या करणाऱ्या तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल झाली.फिर्यादींची चिंता वाढलीघरफोड्या आणि वाहन चोरीतील फिर्यादी रोज पोलिस ठाण्यांमध्ये चकरा मारून तपासाबद्दल विचारणा करतात. मात्र, चोरटा सापडला नसल्याचे सांगून पोलिस त्यांना परत पाठवतात. घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने फिर्यादींची चिंता वाढली आहे.

तीन महिन्यांतील गुन्हे आणि तपासपोलिस ठाणे - दाखल - उकलशाहूपुरी - १०७ - ६५जुना राजवाडा - ६५ - ४५राजारामपुरी - ४५ - ४२लक्ष्मीपुरी - २९ - २७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस