शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चंद्रपूरच्या बुकी मालकाची आलिशान मोटार प्रशांत कोरटकरच्या दिमतीला, फरार काळात तीन राज्यांत वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:11 IST

फरार काळात तीन राज्यांत वावर, बुकी मालकासह चार जणांसोबत संपर्क

कोल्हापूर : चंद्रपूर येथील बुकी मालक धीरज चौधरीची आलिशान मोटार संशयित प्रशांत कोरटकर अस्तित्व लपवण्यासाठी वापरत होता. फरार काळात तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांत असून बुकी मालकासह अन्य चार जणांसोबत संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचे अन्य कोणत्या गुन्हेगारी संबंध आहेत का, कोणत्या संघटना, व्यक्तींचा पाठिंबा आहे का, हॉटेलचे बिल, फिरण्यासाठी किती मोटारी वापरल्या, त्याला पैसे कोणी दिले, याचा तपास करण्यासाठी कोरटकरला पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी शुक्रवारी पोलिसांनी केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर त्याला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याबद्दल कोरटकरला अटक केली. त्याची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी चौथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एस. एस. तट यांनी त्याला आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला शुक्रवारी सकाळीच पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ठेवले. दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुनावणीला सुरुवात झाली. कोरटकरला काही सांगायचे आहे का, असे न्यायाधीशांनी प्रथम विचारले. त्या वेळी त्याचे उत्तर नाही, असे आले. त्यानंतर तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी तपासात एक आलिशान मोटार जप्त केल्याचे सांगितले. त्याने फरार काळात तीन राज्यांत प्रवास केला आहे. त्यामुळे वेगवेगळी वाहने वापरली असल्याची शक्यता आहे.

मात्र तपासात तो परिपूर्ण माहिती देत नाही. केवळ ज्या हॉटेलमध्ये राहिला आहे, त्याची माहिती दिली. त्याने संबधित मालकांचे व्हॉट्सॲपचे क्रमांक दिले आहेत. त्याच्यावर हजर राहण्याचा नोटिसा पाठविल्या आहेत. त्याने सांगितलेली माहिती खरी आहे की खोटी त्याची चौकशी करण्यासाठी दोघांनाही समोरासमोर चौकशी करावी लागणार आहे. तो राहिलेल्या हॉटेलमध्ये कोणती ओळखपत्रे दिली आहेत. त्याच्याकडे ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था नसल्याने पैसे कोणी दिले, याचा तपास करण्यासाठी वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी पोलिसांनी दिलेली कारणे पोलिस कोठडी मिळण्यासाठी योग्य असून कोठडी वाढविली नसल्यास पोलिसांना योग्य तपास करणे शक्य होणार नसल्याचे सांगितले.

सोबत कोण होते, याची माहिती लपवितोकोरटकरने इंद्रजित सावंत यांना फोन केल्यानंतर त्याच्या सोबत आणखी कोण होते, याची माहिती सांगत नाही. २२ फेब्रुवारी २०२५ ते १ मार्च २०२३ आणि १८ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत तो कोठे राहत होता. त्याला आर्थिक मदत कोणी केली. तो पत्रकारितेचे काम करत असल्यामुळे त्याने पोलिस कोठडीत स्वतःविरुद्ध पुरावा होणार नाही, याची काळजी घेत आहे. तो तपासात अपेक्षित असलेली उत्तरे देत नसून असहकार्य करत आहे, त्यामुळे पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी न्यायालयासमोर केली.

कोरटकरचे आश्रयदातेफरार काळात संशयित कोरटरकरने प्रशिक पडवेकर (रा. नागपूर), धीरज चौधरी, रा. चंद्रपूर), हिफाजतअली, राजेंद्र जोशी (रा. इंदूर), साईराज पेंटकर ( रा. करीमनगर) यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. कोरटकर गुन्ह्यातील संशयित असूनही त्याला आश्रय दिला, अशी माहिती सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी न्यायालयासमोर दिली.

धीरज चौधरीची मोटार जप्तमहाराष्ट्र आणि तेलंगणा सीमा भागातून शुक्रवारी रात्री धीरज चौधरी याची मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली. पांढऱ्या रंगाची एसयूव्ही ७०० (एमएच ३४ सीडी ७७२०) या नंबरची मोटार जप्त केली. अजूनही चार मोटारींचा वापर कोरटकरने केला आहे. त्या मोटारी जप्त करायच्या असल्याचे तपास अधिकारी संतोष गळवे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा आवाज बंद करायचा आहे का ?न्यायालयात सुमारे १ तास युक्तिवाद झाला. संशयित कोरटकर याचे वकील सौरभ घाग आणि सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सरोदे यांच्या युक्तिवादावर घाग यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने दोघांत खडाजंगी झाली. युक्तिवाद सुरू असताना घाग यांनी व्हीसीवर हजर असलेल्या सरोदे यांचा आवाज म्यूट करावा, असे सांगितले. त्या वेळी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बंद करणार काय? असा प्रतिप्रश्न सरोदे यांनी उपस्थित केला. त्यावर घाग यांनी तुम्ही माध्यमांसमोर नसून न्यायालयात आहात, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस