शिये ग्रामपंचायतीस वेठीस धरणाऱ्या शेतकरी संघटनेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:28 IST2021-08-13T04:28:11+5:302021-08-13T04:28:11+5:30

शिये : रघुनाथ दादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शिये ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून बदनामी ...

Investigate the farmers' association holding the Shiye gram panchayat in check | शिये ग्रामपंचायतीस वेठीस धरणाऱ्या शेतकरी संघटनेची चौकशी करा

शिये ग्रामपंचायतीस वेठीस धरणाऱ्या शेतकरी संघटनेची चौकशी करा

शिये : रघुनाथ दादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शिये ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शियेच्या सरपंच रेखा जाधव यांच्यासह सर्वपक्षीयांच्या वतीने निवासी जिल्ह्याधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, येथील गावठाण सर्व्हे नंबर २५९ व २८३ मध्ये अनेक पूरग्रस्तांना प्लॉट मिळाले आहेत. सदर प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी अथवा इतर कामासाठी जागा मालक हे पाया काढण्यासाठी उत्खनन करत आहेत. असे असताना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे व त्यांचे सहकारी मात्र बांधकामाला विरोध करून कामे बंद पाडत आहेत. त्यांच्या सततच्या अशा प्रकारामुळे नागरिक, ग्रामपंचायत व अधिकारी त्रस्त झाले आहेत. शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करून शिये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा गट पराभूत झाल्याच्या नैराश्यातून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून भडकविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या संघटनेची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपसरपंच शिवाजी गाडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी सरपंच रणजित कदम, माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, ग्रामपंचायत सदस्य विलास गुरव, तेजस्विनी पाटील, पूनम सातपुते, मंगल कांबळे, कृष्णात चौगुले, प्रभाकर काशीद, बाबासाहेब बुवा, जयसिंग फडतारे, नीलेश कदम, निलेश कांबळे, मच्छिंद्र मगदूम, शिवाजी रानगे, अभिजित पाटील आदींची उपस्थिती होती.

Web Title: Investigate the farmers' association holding the Shiye gram panchayat in check