शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमन मित्तल, लोहार, युवराज बिल्ले यांची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:51 IST

कोरोना काळातील खरेदी घोटाळा प्रकरणातील तक्रारींची शहानिशा करा: आरोग्य सहसंचालकांचे पत्र

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, तत्कालिन जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन लोहार आणि औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांची कोरोनातील भ्रष्टाचार प्रकरणातील तक्रारीबाबत चौकशी करावी, असे पत्र आरोग्य सहसंचालकांनी काढले आहे. त्याला अनुसरून आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांना पत्र काढले असून त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात कोरोनाची लागण सुरू झाल्यानंतर लगेचच मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायजरची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. तातडीने गरज असल्याने जेथून मिळेल तेथून, मिळेल त्या दराने हे साहित्य घेण्यात आले. अशातच तत्कालिन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खरेदीची सर्व जबाबदारी तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर सोपवली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. हळूहळू कोरोनाचे रूग्ण वाढू लागले. त्याबरोबरची खरेदीचे आकडेही वाढू लागले.

विविध नेत्यांच्या कारखान्यांना, नातेवाईकांना जादा किमतीची कंत्राटे कशी मिळाली अशी विचारणा करत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली. सध्याचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आघाडीवर होते. यातूनच मग तक्रारी झाल्या. अशाच एका तक्रारीची दखल घेत आरोग्य सहसंचालकांनी चौकशी करण्याबाबत पत्र पाठवले असून यामध्ये वरील तीनही नावांचा उल्लेख केला आहे. जुलैमध्ये पहिले पत्र आले असून सप्टेंबरमध्ये आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत पत्र काढले आहे.

नेत्यांचे फोन सुरूहे चौकशीचे पत्र आल्यानंतर लगेचच सर्वपक्षीय नेत्यांचे फोन सुरू झाल्याचे समजते. कारण त्या काळामध्ये यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही याबाबत निवेदने देण्यात आली होती. तक्रारीनंतर दोन वर्षांनी पुन्हा चौकशी सुरू झाल्याने नेत्यांनाही यामागे नेमके कोण आहे हे समजेना झाले आहे.

चौकशी करायची कुणाची?मित्तल हे आयएएस अधिकारी असल्याने त्यांची चौकशी जिल्हा परिषद पातळीवर करता येत नाही. नितीन लोहार यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करता येत नाही. राहता राहिले बिल्ले. त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या