खरेदी-विक्री संघाने जोपासले शेतकऱ्यांचे हित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:06+5:302021-02-05T07:03:06+5:30
जयसिंगपूर : डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे. कोरोनाच्या ...

खरेदी-विक्री संघाने जोपासले शेतकऱ्यांचे हित
जयसिंगपूर : डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सामाजिक बांधीलकी जोपासत शेतकऱ्यांना १२८० टन खते पुरविण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नेहमीच वाढ व्हावी, यासाठी संघाच्या वतीने कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
शिरोळ-वाडी रोडवरील कोरे मंगल कार्यालयात संघाची ६९ वी वार्षिक सभा संपन्न झाली. प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष शामराव पाटील यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेत संघास अ वर्ग दर्जा मिळाला असल्याचे सांगितले. मॅनेजर सातगोंडा गौराज यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी आण्णासाहेब पाटील, हसन देसाई, राजू पाटील-टाकवडेकर, उदयसिंह जगदाळे, शेखर पाटील, महादेव राजमाने, महेंद्र बागी, अशरफ पटेल, विनया घोरपडे, दरगू गावडे, पंडित काळे, दिलीप पाटील-कोथळीकर, अशोकराव कोळेकर, धनाजी पाटील, एम. व्ही. पाटील, यशोदा कोळी, शिवगोंडा पाटील उपस्थित होते. साताप्पा बागडी यांनी आभार मानले.
फोटो - २९०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सभेत ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.