शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

Kolhapur: ७ लाखांच्या बदल्यात २४ लाखांची व्याज वसुली, तिघे खासगी सावकार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:58 IST

हातकणंगले पोलिसांची कारवाई

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील तिघा खासगी सावकारांनी मौजे मुडशिंगी येथील औषधी दुकानदाराला व्याजाने दिलेल्या ७ लाखांचे २४ लाख वसूल केले. खासगी सावकाराने परत १७ लाखांची मागणी केल्याने औषधी दुकानदार उत्तम तानाजी पाटील (रा. मुडशिंगी ता. हातकणंगले) यांनी विजय आप्पासो चव्हाण (वय ३९), विष्णू आण्णासो जाधव (४५ ), संतोष बाळू रोहिले (४२, सर्व रा. आळते ता. हातकणंगले) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांच्या मुसक्या आवळल्या.उत्तम पाटील यांचे मौजे मुडशिंगी येथील गणेश मंदिराजवळ औषधी विक्रीचे दुकान आहे. त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये व्यवसाय आणि वैयक्तिक कारणासाठी आळते येथील विजय चव्हाण, विष्णू जाधव आणि संतोष रोहिले यांच्याकडून प्रति माहिना ३ टक्के व्याजदराने ७ लाख रुपये घेतले होते. उत्तम पाटील यांनी वेळाेवेळी व्याज आणि घेतलेली मुद्दल अशी २४ लाख रुपयांची परतफेड केली.तरीही या खासगी सावकारांनी उत्तम पाटील यांच्याकडे आणखी १७ लाख देण्यासाठी तगादा लावला होता. पाटील यांच्यासह कुुटुंबाला मानसिक त्रास दिला जात होता. खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून पाटील यांनी त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विजय आप्पासो चव्हाण, विष्णू आण्णासो जाधव, संतोष बाळू रोहिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.भिशीचे पेव तालुक्यातील गावागावांमध्ये लिलाव भिशीचे पेव फुटले आहे. १ लाखाच्या रकमेला लिलाव भिशीमध्ये ३० हजारापर्यंत व्याज आकारणी करून भिशीचालक सर्वसामान्यांची लूट करीत आहेत. भिशीच्या नावाखाली व्याजाचा गोरखधंदा जोरात सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस