सात पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:26 IST2021-03-16T04:26:24+5:302021-03-16T04:26:24+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी सायंकाळी दिले. ...

Inter-district transfers of seven police officers | सात पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

सात पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी सायंकाळी दिले. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची भुदरगड, श्रीपाद यादव शहापूर व श्रीकांत कंकाळ यांची सायबर पोलीस ठाणेकडे बदली केली आहे.

बदली झालेल्या पोलीस अधिकऱ्यांची नावे, (कंसातील जुने ठिकाण) : पोलीस निरीक्षक संजय मोरे - भुदरगड पोलीस ठाणे (सायबर पोलीस ठाणे), पो. नि. श्रीप्रसाद यादव - शहापूर पोलीस ठाणे (आर्थिक गुन्हे शाखा), पो. नि. श्रीकांत कंकाळ - सायबर पोलीस ठाणे (भुदरगड पोलीस ठाणे). सहायक पोलीस निरीक्षक विकास आडसुळ - शहर वाहतूक शाखा इचलकरंजी (कुरुंदवाड पोलीस ठाणे), सहा. पो. नि. स्वाती सूर्यवंशी - वडगाव पोलीस ठाणे (गडहिंग्लज पो. ठा.), सहा. पो. नि. रमेश गायकवाड - शिवाजीनगर पोलीस ठाणे (नियंत्रण कक्ष, कोल्हापूर), पोलीस उपनिरीक्षक शरद माळी - नियंत्रण कक्ष, कोल्हापूर (गडहिंग्लज पो. ठा).

जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत या बदल्यांबाबत निर्णय घेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश प्राप्त होताच तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होऊन अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले आहेत.

Web Title: Inter-district transfers of seven police officers