इच्छुकांचा सोशल मिडीयावर जोर -प्रचार आत्तापासूनच सुरु

By Admin | Updated: July 30, 2014 00:31 IST2014-07-29T23:37:52+5:302014-07-30T00:31:29+5:30

मिळणाऱ्या हिटस् व प्रतिक्रिया सावध लक्ष

Intentional debate on social media has started from now | इच्छुकांचा सोशल मिडीयावर जोर -प्रचार आत्तापासूनच सुरु

इच्छुकांचा सोशल मिडीयावर जोर -प्रचार आत्तापासूनच सुरु

संतोष पाटील -  कोल्हापूर ,, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा विकास करण्यास कसे योग्य उमेदवार आहोत, याचा आतापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे. तरुणाईचे डोके सोशल मीडियातून वर येत नाही, तर समाजातील ‘मत’ बनवू शकणारा मोठा घटक सातत्याने सोशल मीडियाशी जोडून आहे. आमदारकीच्या स्वप्नाला बळ मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसह कार्यकर्त्यांचे ‘फेसबुक’, ‘वॉटस् अ‍ॅप’सारखी माध्यमातील वावर वाढला आहे.
कोल्हापुरातील एकूण लोकसंख्येपैकी १२,३०,००९ लोक शहरी भागात राहतात. एकूण लोकसंख्येच्या ३१.७३ टक्के शहरात, तर ग्रामीण भागात ६८.२७ टक्के लोक राहतात. शहरी भागात शिक्षित लोकांचे प्रमाण ८८.२८ टक्के आहे. ग्रामीण भागात ७८.३५ टक्केआहे. गेल्या दोन वर्षांत शहरीभागाच्या बरोबरीने इंटरनेटचा वापर होऊ लागला आहे. दरवर्षी किमान २० टक्के लोक नव्याने जोडले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव प्रकर्षाने जाणवल्यानंतर संगणकीय ज्ञानात कच्चे असणाऱ्या नेत्यांनी खास तज्ज्ञांना यासाठी पाचारण केले आहे. सकाळी उठल्यापासून दिवसभरातील घडामोडी फेसबुक व वॉटस्अ‍ॅपच्या गु्रपवर शेअर केल्या जात आहेत. सोशल मीडियावरून येणाऱ्या सूचना व समस्या सोडविण्यासाठी अनेकांनी स्वतंत्र पथकच तयार ठेवले आहे. केलेले आंदोलन, मोर्चा, विकासकामे, आवाहन, सोडविलेल्या समस्या, आदी तातडीने अपडेट केल्या जात आहेत.

नेत्यांची कनेक्टिव्हिटी..............
-गृहराज्यमंत्री सतेज पाटील ‘वॉटस् अ‍ॅप’वर बाराशे
लोकांशी सातत्याने कनेक्ट, फेसबुकवर दर दोन
तासांची ‘अपडेट’
-खासदार राजू शेट्टींच्या ‘उसाचा दर किती असावा? ’
यास विक्रमी ५७ हजार कॉमेंटस्
-खासदार शेट्टी यांच्या दररोज फेसबुकवर ताज्या घडामोडी अपलोड, ग्रामीण भागासह शहरी तरुणांचा वाढता पाठिंबा
-आमदार सुरेश हाळवणकर यांची फेसबुकवर चार पेजसह २५ हजार फ्रेंडलिस्ट
-फौंडेशनच्या माध्यमातून कामगारमंत्री हसन मुश्रीफ ‘कनेक्ट’
-आमदार राजेश क्षीरसागर यांचे फेसबुकवर तीन पेजसह
२२ हजार फ्रेंडलिस्ट, वॉटस्अ‍ॅपवर दहाहून अधिक ग्रुप
-खासदार धनंजय महाडिक सातत्याने संपकर् ाबरोबरच संसदेतील भाषणे वॉटस्अ‍ॅप ग्रुपवर अपलोड करतात.
-विनय कोरे जनसुराज्य फौंडेशन पेजला वाढता प्रतिसाद
-आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संजय पवार, राजीव आवळे, सत्यजित पाटील, नरगसेवक सत्यजित कदम, संजय
घाटगेंचा वावर वाढला.

Web Title: Intentional debate on social media has started from now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.