सराफी व्यवसायात सचोटी हाच यशाचा मूलमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:37+5:302021-05-12T04:24:37+5:30
कोल्हापूर : सराफी व्यवसायात सचोटीने ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. सचोटीचा व्यवहार हाच या व्यवसायाचा यशस्वी मूलमंत्र आहे. ...

सराफी व्यवसायात सचोटी हाच यशाचा मूलमंत्र
कोल्हापूर : सराफी व्यवसायात सचोटीने ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. सचोटीचा व्यवहार हाच या व्यवसायाचा यशस्वी मूलमंत्र आहे. खरेदी- विक्रीचे व्यवहार सरकारी नियम पाळूनच करायला हवेत, असे मत सराफ व्यावसायिक अविनाश मुखरे यांनी व्यक्त केले.
सोनार समाजाच्या राज्यस्तरीय महामंडळाच्या वतीने आयोजित ‘यशस्वी सराफ व्यावसायिकांच्या यशोगाथा’ या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयदीप रत्नपारखी होते.
संजय बानकर यांनी ‘ग्राहक हाच परमेश्वर’ मानून त्यांना समाधानी कसे ठेवता येईल या गोष्टीवर भर द्यावा आणि युवा पिढीने स्पर्धेच्या जगात टिकून राहावे, असे मत मांडले. अनिल धर्माधिकारी यांनी राजकारण आणि व्यापार या दोन्ही गोष्टी कष्टाने आणि प्रामाणिकपणाने काम केले तरच साध्य होतात, असे सांगितले. अविनाश पंडित यांनी सराफी व्यवसायात पारदर्शकता, नावीन्याचा शोध, मुखात गोडवा, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात,’ असे विचार मांडले. आश्लेषा पोतदार यांनी सूत्रसंचालन, तर गौरव पोतदार यांनी प्रास्ताविक केले. विनायक पोतदार यांनी आभार मानले.
--