महाडिक कुटुंबीयांतर्फे बाराशे रिक्षाचालकांना विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:38+5:302021-02-05T07:13:38+5:30
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनेकजण जिलेबी, मिठाई अथवा शालेय मुलांना गणवेश वाटप करतात. मात्र, माजी खासदार धनंजय ...

महाडिक कुटुंबीयांतर्फे बाराशे रिक्षाचालकांना विमा कवच
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनेकजण जिलेबी, मिठाई अथवा शालेय मुलांना गणवेश वाटप करतात. मात्र, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. २६) महाडिक कुटुंबीयांतर्फे जिल्ह्यातील ११८७ रिक्षाचालकांचा विमा उतरविण्यात आला.
ताराराणी चौकातील महाडिक यांच्या पेट्रोल पंपात आंतरराष्ट्रीय फाॅम्युला मोटारकार रेसर कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रथम पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक यांच्या हस्ते तुळशीला पाणी घालून करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील महाराष्ट्र वाहतूक सेना, रिक्षा सेना, मनसे वाहतूक सेना, आदर्श रिक्षा संघटना, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघ, करवीर ऑटो रिक्षा संघटना, न्यू करवीर ऑटो रिक्षा संघटना आदी रिक्षा संघटनांच्या ११८७ सभासद रिक्षाचालकांनी या विमा संरक्षणाचा लाभ घेतला. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उपक्रमस्थळी भेट देत रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राजू जाधव, चंद्रकांत भोसले, वसंत पाटील, विजय गायकवाड, राजू जाधव (मनसे), सुभाष शेटे, ईश्वर चैनी, राजेंद्र थोरवडे, आदिनाथ दिंडे, शर्फुद्दीन शेख, संजय केसरकर, आदी उपस्थित होते.
कोट
सार्वजनिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून जिल्ह्यातील ११८७ रिक्षा व्यावसायिकांचा महाडिक कुटुंबीयांनी विमा उतरविण्याचा उपक्रम राबविला. अशा पद्धतीने कोल्हापुरात प्रथमच हा उपक्रम राबवून महाडिक कुटुंबीयांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला.
-कृष्णराज महाडिक, फाॅम्युला कार रेसर,
फोटो : २७१०२०२१-कोल-महाडिक
आेळी : माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाडिक कुटुंबीयांतर्फे जिल्ह्यातील ११८७ रिक्षाचालकांंना विमा संरक्षण देण्यात आले. यावेळी कृष्णराज महाडिक, विश्वजित महाडिक, पृथ्वीराज महाडिक आदी उपस्थित होते.