शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

एकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापना, राजू राऊत यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:23 IST

पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे मान्य न झाल्याने गणेशोत्सवात नवे लेखन आणि काव्याची निर्मिती करणे हीच पूजा ते मानतात.

ठळक मुद्देएकाच गणेशमूर्तीची २२ वर्षांपासून प्रतिष्ठापनारंकाळा प्रदूषित न करण्याचा संकल्प

संदीप आडनाईक कोल्हापूर : पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे मान्य न झाल्याने गणेशोत्सवात नवे लेखन आणि काव्याची निर्मिती करणे हीच पूजा ते मानतात.समविचारी मित्रांसोबत त्यांनी ३२ वर्षांपूर्वी ‘रंकाळा बचाओ’ चळवळ सुरू केली. ही चळवळ उभारताना जलसाठा प्रदूषित होण्यामागील अनेक कारणांपैकी गणेशमूर्तींचे विसर्जन हा एक मोठा घटक असल्याचे लक्षात आल्यानंतर रंकाळा तलावाशेजारीच असलेल्या आणि केवळ सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात, त्या इराणी खणीत राऊत यांनी घरच्या मूर्तीचे विसर्जन सुरू केले. एकट्याच्या गणपतीने काय फरक पडणार, अशी कुचेष्टा करणारी मंडळीही आज मूर्तीदान चळवळीला प्रतिसाद देत आहेत, हा सकारात्मक बदल घडल्याचे राऊत म्हणतात.चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, अभिनय, नाटक, लेखन, शाहिरी, काव्य यांसारख्या नानाविध कलाक्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या राऊत यांनी बदलाची सुरुवात घरापासून या विचारांतून बुद्धीदाता गणेशाचे घरातून विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आणि २२ वर्षांपूर्वी छोट्या फायबरच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली.

गणेशोत्सवात या मूर्तीची षोडशोपचारे यथासांग पूजा, आरती केली जाते. त्यानंतर उत्तरपूजा करून हा गणपती पुन्हा शोकेसमध्ये ठेवला जातो. याला त्यांच्या पत्नी आणि कन्याही साथ देतात.

गणेशाचा आशीर्वाद असल्यामुळेच इतके कलाप्रकार मला अवगत आहेत. कलाकार असल्यामुळे त्याचे विसर्जन न करता गणेशोत्सवात मूर्तीसमोर एखादे नवे लेखन आणि काव्यनिर्मिती करतो, ही पूजा मी मानतो. आजकाल उत्सवातील भाव बाजूला पडून आवाज, नाचगाणे यांसारखे हिडीस आणि बीभत्स प्रकार वाढू लागले आहेत. त्याऐवजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे.राजू राऊतशिवशाहीर, कलावंत, कोल्हापूर

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर