नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पुढील दहा दिवस उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:45 PM2023-01-28T13:45:51+5:302023-01-28T13:46:10+5:30

रांगोळ्यांनी रस्ते फुलले

Installation of idol of Krishnaveni Mata in Datta Mandir area of Nrisimhwadi | नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पुढील दहा दिवस उत्सव

नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पुढील दहा दिवस उत्सव

Next

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात आज, शनिवारी श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

आज पासून पुढील दहा दिवस उत्सव सुरु राहणार असून दत्त मंदिराच्या उत्तरबाजूस मंडप व शामियाना उभारण्यात आला आहे. आज पहाटे पाच वाजता मानकरी जनार्दन, सचिन, संदीप व पवन  कागलकर आणि परिवार या मानकरींच्या घरातून श्री कृष्णावेणीची सालंकृत मूर्ती वाद्य, गजरासह मिरवणुकीने उत्सव मंडपात आणण्यात आली.

घोडे, भालदार, चोपदार, दिवटी, छत्र चामर आणि वाद्यवृंदतसेच दुतर्फा ब्रम्हवृंद, घोडा आदी मिरवणूकीत सामील झाल्याने मिरवणुकीची शोभा वाढली. नृसिंहवाडी सह कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, सांगली आदी भागातून आलेल्या महिलांनी मिरवणुकीवेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाळले व आशीर्वाद घेतले.

सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेची वेदशास्त्र संपन्न अवधूतशास्त्री बोरगावकर व दिलीप उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली नवल खोंबारे  यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली. व जगतकल्याणासाठी मातेची प्रार्थना करणेत आली. पूजेनंतर  ऋकसंहिता, ब्राम्हण, अरण्यक, श्री गुरुचरित्र, कृष्णामहात्म्य, श्रीमद् भागवत, श्री सुक्त, रुद्र एकादशिनी, सप्तशती आदी पारायणास आरंभ झाला.

दुपारी नैवेद्य आरती झालेनंतर तीन वाजता एकविरा भजनी मंडळ यांचे कृष्णा लहरी पठण, चार वाजता वेद शास्त्र संपन्न हरी नारायण चोपदार यांचे पुराण सायंकाळी पाच वाजता प्रसाद शेवडे (देवगड) यांचे गान व रात्री 9.30 वाजता ह.भ.प.नंदकुमार कर्वे रा.पनवेल यांचे सुश्राव्य कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले.

रांगोळ्यांनी रस्ते फुलले

संस्कार भारती शाखा, नृसिंहवाडी व सोलापूर  यांनी पूर्ण मिरवणूक मार्गावर घातलेल्या आकर्षक रांगोळी व नयनरम्य गालीच्यामुळे मिरवणूक मार्गावरील रस्ते विलोभनीय दिसत होते.

उद्या दि.29 रोजी दुपारी 5 वाजता भाग्येश मराठे (मुंबई)यांचे गायन व रात्रो 9.30 वाजता ह.भ.प.नंदकुमार कर्वे रा.पनवेल यांचे सुश्राव्य कीर्तन असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

Web Title: Installation of idol of Krishnaveni Mata in Datta Mandir area of Nrisimhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.