होगाडे यांच्या तक्रारीवर चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:50 IST2020-12-05T04:50:59+5:302020-12-05T04:50:59+5:30
कोल्हापूर : स्वेच्छानिवृत्ती घेतलेेले साहाय्यक लेखाधिकारी प्रवीण होगाडे यांच्या तक्रारीवर चौकशी सुरू करण्यात आले आहे. होगाडे यांनी मुख्य लेखा ...

होगाडे यांच्या तक्रारीवर चौकशी सुरू
कोल्हापूर : स्वेच्छानिवृत्ती घेतलेेले साहाय्यक लेखाधिकारी प्रवीण होगाडे यांच्या तक्रारीवर चौकशी सुरू करण्यात आले आहे. होगाडे यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास यांची या कामी चौकशी समिती नेमली आहे. त्यांच्याकडे बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. यावेळी होगाडे यांनी आपली बाजू मांडली व सविस्तर लेखी म्हणणे दिले. कागलच्या तत्कालीन गटविकास अधिकारी शबाना माेकाशी यादेखील सुनावणीसाठी उपस्थित होत्या. त्या उद्या, शुक्रवारी लेखी म्हणणे देणार आहेत.