कृषी विभागातील भ्रष्टाचाऱ्याची चौकशी सुरू-खोटी कागदपत्रे, खोटे करार व खोटी मोजमापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 13:54 IST2018-11-19T13:53:06+5:302018-11-19T13:54:43+5:30

राज्य सरकारच्या कृषी विभागात पॅक हाऊस, शेततळे, फळ प्रक्रिया केंद्र, शेड नेट आदींमध्ये कोट्यावधी रूपयांचा झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी पोलीसांनी सुरू केल्याची माहिती नाथाजी पोवार यांनी पत्रकातून दिली. 

Inquiry of corrupt inquiry in agriculture department | कृषी विभागातील भ्रष्टाचाऱ्याची चौकशी सुरू-खोटी कागदपत्रे, खोटे करार व खोटी मोजमापे

कृषी विभागातील भ्रष्टाचाऱ्याची चौकशी सुरू-खोटी कागदपत्रे, खोटे करार व खोटी मोजमापे

ठळक मुद्देलाखो रूपयांची बिले लाभार्थ्याला दिल्याचे भासवून अधिकारी, कर्मचार व लाभार्थ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला.

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कृषी विभागात पॅक हाऊस, शेततळे, फळ प्रक्रिया केंद्र, शेड नेट आदींमध्ये कोट्यावधी रूपयांचा झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी पोलीसांनी सुरू केल्याची माहिती नाथाजी पोवार यांनी पत्रकातून दिली. 


कृषी विभागाकडून कोरडूवाहू क्षेत्र विकास व राष्ट्रीय  फलोत्पादन अभियान अंतर्गत २०१३ पासून पॅक हाऊस, शेततळे, फळ प्रक्रिया केंद्र, शेड नेट असे कोट्यावधी रूपयांचे प्रकल्प राबविण्यात आले. सदरचे प्रकल्प शासनाच्या नियम व निकषानुसार पुर्ण झाल्याचे दाखविण्यासाठी खोटी कागदपत्रे, खोटे करार व खोटी मोजमापे करून लाखो रूपयांची बिले लाभार्थ्याला दिल्याचे भासवून अधिकारी, कर्मचार व लाभार्थ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला.

याबाबत शासकीय पातळीवर तक्रार केली होती. त्याची दखल घेतली पण संबधित विभागाकडून चौकशीचा आदेश पुढे सरकलाच नाही. पोलीस महासंचालकांकडे पाठपुराव केल्यानंतर त्यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षकांना तालुका स्तरावर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती नाथाजी पोवार यांनी पत्रकात म्हटले आहे. 

 

Web Title: Inquiry of corrupt inquiry in agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.