शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

साहाय्यक निबंधकची चौकशी करा

By admin | Updated: March 9, 2015 23:50 IST

श्रीपतराव शिंदे : गडहिंग्लजमध्ये जनता दल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मागणी

गडहिंग्लज : सहकार खात्याच्या गडहिंग्लज साहाय्यक निबंधक कार्यालयात उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याचे पुरावे आहेत. आरोप खोटा ठरला, तर शिक्षा भोगू. मात्र, जनतेला वेठीला धरणाऱ्या साहाय्यक निबंधक ए. एच. भंडारे यांची सहकारमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी सोमवारी केली.शहरातील श्री राम मंदिरात जनता दल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गडहिंग्लज, हेब्बाळ, हुनगिनहाळ व अत्याळ येथील सेवा संस्था निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार झाला. गडहिंग्लज शहर व तालुका आणि आजरा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.शिंदे म्हणाले, डॉ. दाभोळकर व कॉ. पानसरे यांच्या खुनात साधर्म्य असल्यामुळे त्या पाठीमागील जातीयवादी शक्तींचा बंदोबस्त करायला हवा.मेळाव्यास प्रा. स्वाती कोरी, श्रीपती कदम, बाळासाहेब मोरे, भीमराव पाटील, पापा चौगुले, बसवराज खणगावे, नितीन देसाई, सज्जन तोडकर, मारुती संती, संजय रोटे, शिवानंद घस्ती, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)आमच्या दणक्यानेच पुलास मंजुरीतारेवाडी पुलासाठी जनता दलाने वेळोवेळी आंदोलने केली. नरसिंगराव पाटील यांच्यासह तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. आमच्या दणक्यामुळेच तारेवाडी पुलास मंजुरी मिळाल्याचा दावा अ‍ॅड. शिंदेंनी केला.नेसरीत उपोषणाला बसणारहेब्बाळ जलद्याळ येथील पीडित महिलेची तक्रार घेण्यास नेसरीचे पोलीस टाळाटाळ करीत आहेत. कारवाई न झाल्यास नेसरी पोलीस ठाण्यासमोर स्वत: उपोषणाला बसणार आहोत, अशी घोषणा शिंदे यांनी केली.शिंदे म्हणाले,‘एव्हीएच’ प्रकल्पाच्या उत्पादनाला कायमची बंदी घालावी व आंदोलकांवर कोणतीही कारवाई करू नये.शेतकरीविरोधी व भांडवलदारधार्जिणा भूसंपादन कायदा रद्द करावा.चित्रीचे पाणी गडहिंग्लजच्या पूर्व भागालाही मिळावे यासाठी लढा उभारणार.६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी.