'संत गजानन'मध्ये इनोव्हेशन रिसर्च सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:14+5:302021-01-13T05:01:14+5:30
गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये इनोव्हेशन रिसर्च सेंटर सुरू करण्यास केंद्रीय मानव संसाधन ...

'संत गजानन'मध्ये इनोव्हेशन रिसर्च सेंटर
गडहिंग्लज :
चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये इनोव्हेशन रिसर्च सेंटर सुरू करण्यास केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून, पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव पॉलिटेक्निक आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
प्राचार्य डॉ. संजय दाभोळे म्हणाले, ग्रामीण विद्यार्थ्यांना नवीन संशोधनासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचे 'स्टार्टअप'मध्ये रूपांतर करणे हा या केंद्राचा उद्देश आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे.
उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांच्यासमवेत कार्यशाळा, व्याख्यान, परिसंवाद, नवकल्पना स्पर्धा आयोजित करून नवोदितांसाठी मार्गदर्शक सेतू तयार करण्यात येईल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दाभोळे यांनी केले आहे.
---------------------
फोटो ओळी : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन पॉलिटेक्निकला इनोव्हेशन रिसर्च सेंटर मंजुरीचे प्रमाणपत्र मिळाले. यावेळी संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, अॅड. बाळासाहेब चव्हाण, संतोष गुरव आदी उपस्थित होते.
क्रमांक : ११०१२०२१-गड-०३