दुचाकी धडकेत जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:23 IST2021-03-17T04:23:12+5:302021-03-17T04:23:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ताराराणी चौक ते दाभोळकर चौक रस्त्यावर भरधाव दुचाकीने ठोकल्याने पादचारी जखमी झाल्या. दिशा शशिकांत ...

Injured in a two-wheeler collision | दुचाकी धडकेत जखमी

दुचाकी धडकेत जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ताराराणी चौक ते दाभोळकर चौक रस्त्यावर भरधाव दुचाकीने ठोकल्याने पादचारी जखमी झाल्या. दिशा शशिकांत कांबळे (रा. नंदगाव, ता. शाहुवाडी) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत राजेश बाळासाहेब कांबळे (रा. वाकरे, ता. करवीर) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार नोंदवली असून त्यावरुन दुचाकीचालक सौरभ अनिल तेलवेकर (रा. शिवाजी चौक, कासारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकी चोरी

कोल्हापूर : ताराराणी चौक ते उड्डाणपूल दरम्यानच्या मार्गावर रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने बनावट चावीने लॉक काढून चोरुन नेली. याबाबत दुचाकीमालक रवींद्र उदयसिंह बदोडकर (वय ३५ रा. पोस्टल कॉलनी, वीर सावकरनगर, पाचगाव, ता. करवीर) यांनी दुचाकी चोरीची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Injured in a two-wheeler collision