पेठवडगाव: अल्पवयीन मुले हातामध्ये बेल्ट, बॅट आणि दांडके घेऊन लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुले लहान विद्यार्थ्यांना रॅगिंग करुन मारहाण करत असल्याची घटना व्हायरल व्हिडिओमुळे समोर आली आहे. हातात बेल्ट, बॅट आणि दांडके घेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणानंतर पालकांसह नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हॉस्टेल प्रशासन अथवा पोलिसांकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण हे शाळेच्या हॉस्टेलमधील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.रेक्टर विरोधात गुन्हा हॉस्टेलमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या भांडणात आरोपीने दोन्ही मुलांना ताकिद दिली होती. याच भांडणाच्या कारणावरून पीटी परेडवेळी आरोपीने जखमी विद्यार्थ्यास स्टेजवर नेऊन मारहाण केली होती. यात विद्यार्थ्यास दुखापत झाली. हा प्रकार सोमवारी (दि.६) ला घडला होता. याप्रकरणी मंगळवारी (दि.७) रेक्टर विरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
समाज माध्यमावर प्रसारित होत असलेला व्हिडिओ हा जुना आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान काल काहीनी हेतुपुरस्सर हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. दरम्यान काल विद्यार्थ्यास माराहण केलेल्या रेक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. यापुढे अशी घटना घडणार नाही यांची संस्थेने दक्षता घेतली आहे. - रूपाली पाटील, अध्यक्षा
Web Summary : A shocking video from a Kolhapur hostel shows minors brutally beating younger students with belts and sticks. The incident, a case of ragging, has sparked outrage. Police are investigating following a previous incident involving a rector.
Web Summary : कोल्हापुर के एक छात्रावास का एक चौंकाने वाला वीडियो सामने आया है जिसमें नाबालिग छात्र छोटे छात्रों को बेल्ट और डंडों से बेरहमी से पीट रहे हैं। रैगिंग की इस घटना से आक्रोश फैल गया है। रेक्टर से जुड़े एक पिछली घटना के बाद पुलिस जांच कर रही है।