शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर रेल्वे स्थानकात बॉम्ब? १५ मिनिटांत यंत्रणा हजर; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 19:13 IST

प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे निकामीही करण्यात आला

उद्धव गोडसेकोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर बॉम्ब असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आणि अवघ्या पंधरा मिनिटांत सर्व यंत्रणा रेल्वे स्थानकात पोहोचल्या. प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे निकामीही करण्यात आला. या सर्व प्रकाराने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली.

मात्र, हे मॉकड्रील असल्याचे कळताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, तर सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीने अधिका-यांचा विश्वास वाढला. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचा आढावा घेणारे मॉकड्रील बुधवारी (दि. ११) दुपारी झाले.रेल्वेपोलिस सदा पाटील यांच्या मोबाईलवर बुधवारी दुपारी दोन वाजून ४९ मिनिटांनी अज्ञाताचा फोन आला. रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागात आणि प्रतीक्षालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पाटील यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, एटीएस, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दल, शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिका-यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्व सुरक्षा यंत्रणा पुढील १५ मिनिटांत रेल्वे स्थानकात पोहोचल्या.एक तास १६ मिनिटांचे मॉकड्रीलप्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून बॉम्ब शोधक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने दोन्ही बॉम्बचा शोध घेतला. त्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सुरक्षित स्थळी बॉम्ब निकामी करण्यात आले. या सर्व प्रक्रियेला एक तास १६ मिनिटांचा वेळ लागला. अखेर रेल्वे स्थानकात खरा बॉम्ब नव्हता, तर ते सुरक्षा यंत्रणांचे मॉक ड्रील असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आणि प्रवाशांची जीव भांड्यात पडला. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेPoliceपोलिस