शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:34 IST

आयुब मुल्ला खोची: हातकणंगले तालुक्यात वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्रच ...

आयुब मुल्लाखोची: हातकणंगले तालुक्यात वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्रच कीडग्रस्त होवू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. फुलकळीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकावरच कीड आल्याने शेंगा फुलण्याचे परिणामी उत्पन्न घटण्याचे संकट उभा राहणार आहे.मूळातच मान्सून उशिरा आल्याने पेरण्या वेळाने झाल्या. सोयाबीन क्षेत्रात त्यामुळे घट झाली. भुईमूग, उडीद, मूग याचे क्षेत्र वाढले. ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी गडबडीत सोयाबीन पेरणी केली. त्यानंतर मान्सून वर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी पंधरा दिवस उशिरा पेरणी केली. आता जवळपास दोन महिन्यांचे पीक आले आहे. फुलकळी सुरू असल्याची अवस्था आहे.परंतु गेली पंधरा दिवस झाले पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यातच ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे पाने खाणाऱ्या किडीची वाढ झपाट्याने होवू लागली आहे. या अळीस स्पोडॉप्टर (तंबाखूवरील  पाने खाणारी अळी असे म्हणातात. ही अळी बहुभक्षी असून विविध प्रकारच्या वनस्पतीवर उपजीविका करते.सोयाबीनच्या एका झाडावर पस्तीस ते चाळीस अळी हल्ला करताना दिसत आहेत. ही अळी पानाच्या खाली सुमारे ३५० अंडी घालते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने पसरू लागला आहे. पाने खाण्यामुळे हरित अन्नद्रव्यच तयार होवू शकत नसल्याने  भरगच्च बियाणांच्या शेंगांच लागणे मुश्किल झाले आहे.हातकणंगले तालुक्यात ११ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे. यातील बहुतांश क्षेत्र प्रादुर्भावाने बाधित झाले आहे. कृषी विभागाने याचा पाहणी करून शेतकऱ्यांना उपाय योजना सुचवणे गरजेचे आहे. 

पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असताना आता किडीचा भयानक प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे उत्पादन घट होवून नुकसान होणार आहे. - वसंत पाटील, शेतकरी ,लाटवडेकीड वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने आठवड्यात किडीचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे.अंडी व अळी नष्ट करण्यासाठी सकाळी किंवा सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास औषध फवारणी करावी. - योगेश चौगुले , मार्तंड शेती भांडार -  लाटवडे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी