शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

किती हातांना काम दिले हे नरकेंनी सांगावे --: पी. एन. पाटील यांची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:02 IST

‘विकास केला..विकास केला..’ अशा वल्गना करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारसंघातील किती तरुणांच्या हाताला रोजगार दिला, हे जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिले. लोकांत सहानुभूतीची लाट तयार झाली असून, माझा विजय त्यांनीच निश्चित केला आहे. आमदार सतेज पाटील ताकदीने प्रचारात उतरल्याने मोठे बळ मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपी. एन. पाटील रोखठोककरवीर मतदारसंघात सहानुभूतीची लाट; जनतेनेच विजयाचा विडा उचललाय

विश्वास पाटील ।कोल्हापूर : ‘रस्ते केले व हॉल बांधले म्हणजे विकास नव्हे, ते आमदाराचे प्राथमिक कामच आहे. तुम्ही मतदारसंघात किती नवे प्रकल्प आणले, किती तरुणांच्या हाताला काम दिले, किती संस्थांची उभारणी केली, याचा हिशेब त्यांनी द्यावा. आम्ही दुसऱ्यांनी काढलेल्या संस्थांवर उड्या मारून बसलो नाही. स्वत: संस्थांची स्थापना केली व त्या अतिशय चांगल्या चालवून दाखविल्या. दिंडनेर्लीच्या फोंड्या माळावर सूतगिरणीचा प्रकल्प उभारला. तिथे सुमारे ८०० हून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले. कोल्हापूर जिल्हा बँक, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ, भोगावती साखर कारखाना, श्रीपतराव दादा बँक या संस्थांच्या माध्यमातून सुमारे दोन हजारांहून जास्त तरुणांना नोकºया दिल्या. या तरुणांकडून अर्धा कप चहाही न घेता त्यांच्या आयुष्याची घडी बसवून दिली, असे पी.एन. यांनी सांगितले.

एकदा पराभव झाला, तर पुढची पाच वर्षे लोक शोधून सापडत नाहीत. मी सातत्याने मतदारसंघातील जनतेच्या सुखदु:खात सहभागी झालो. मतदारसंघातील माणूस म्हणजे माझे कुटुंब आहे, असे समजून त्यांच्या अडीअडचणीला धावून गेलो. म्हणूनच आजही मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे आहे. प्रसंग कोणताही असो, साहेबांना एक फोन केला, की मला काही ना काही मदत मिळणार, हा विश्वास त्याला आहे. हे पाठबळ आणि अकृत्रिम प्रेम मला आजपर्यंत मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो; त्यामुळे या जनतेनेच आता माझ्या विजयाचा विडा उचलला आहे.’

या निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास नक्की वाटतो, त्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत लोक मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये आले आहेत. मी स्वत: १४ हजार लोकांच्या गळ्यात काँग्रेसचा स्कार्फ घालून त्यांचा सन्मान केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत ताकदीने आणि मनापासून प्रचारात उतरली आहे. या पक्षाचे ३० हजारांहून अधिक मतदान या मतदारसंघात आहे. दोन्ही काँग्रेसची एकजूट झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सक्रीय पाठिंबा दिला आहे. गगनबावडा तालुक्यात पी. जी. शिंदे हे माझ्या प्रचारात राबत आहेत. पन्हाळा, गगनबावड्यासह करवीरच्या उत्तरेकडील वडणगेपासून शियेपर्यंतच्या परिसरात नरके यांच्याविरोधात जनतेतून मोठा उठाव आहे. लोकांनी यावेळी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले.शेकापने आघाडीधर्म पाळावा

ज्या ज्या वेळी मित्रपक्षांशी आघाडी झाली, तेव्हा प्रामाणिकपणे आघाडीधर्म पाळून मी प्रचार केला आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक तसेच संभाजीराजे, धनंजय महाडिक यांच्यावेळी जनतेला त्याचा प्रत्यय आला आहे. जातीयवादी शक्तींना थोपविण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आघाडीत शेकापदेखील आहे. त्यांनी या मतदारसंघातच वेगळी भूमिका का घेतली, हे समजत नाही. या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आघाडीधर्म पाळून सहकार्य करावे. 

भोगावतीची घडी बसविलीभोगावती कारखान्याची गेल्या अडीच वर्षांत घडी बसविण्याचा प्रयत्न केला. उसाची बिले दिली. कामगारांचा पगार दिला. एक रुपयांचा भत्ता न घेता कारखान्याचा कारभार करत आहे. यापूर्वी घेतलेले ५८० कर्मचारी मला भेटायला आले होते. त्यांना ‘तुम्ही माझे वैरी नाही. तुम्ही काम करत करा,’ तुमच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे आश्वासन दिले. ते सर्व विश्वासाने काम करत आहेत, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले. 

राजकारणात आल्यापासून गेल्या ३४ वर्षांत एकच पक्ष, एकच विचार व गांधी घराण्याला एकच नेता मानून राजकारण करत आलो. अनेक पक्षांतून आॅफर आल्या. प्रलोभने दाखविली गेली; परंतु काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. पराभूत झालो म्हणून कधी हार मानली नाही.-पी. एन. पाटील 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकcongressकाँग्रेस