शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भारत नवव्यांदा सॅफ फुटबॉल चॅम्पियन, कोल्हापुरात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 12:02 IST

प्रत्येकाचे मोबाइल स्टेटस विजयाच्या शुभेच्छांनी भरून गेले

कोल्हापूर : सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताने कुवेतवर मात करत या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविल्यानंतर कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींनी मंगळवारी रात्री उशिरा जल्लोष केला. बंगळुरू येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने कुवेतचा पराभव केला. यामुळे शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडू, फुटबॉलप्रेमींनी या विजयाचा आनंद साजरा करत रात्री उशिरा बाइक रॅली काढली. अनेकांनी तिरंगा ध्वजासह हा जल्लोष साजरा केला. प्रत्येकाचे मोबाइल स्टेटस विजयाच्या शुभेच्छांनी भरून गेले होते.चुरशीच्या झालेल्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पेनल्टी शूटआउटमध्ये बलाढ्य कुवेतचा ५-४ असा पराभव केला. या थरारक विजयासह भारताने विक्रमी नवव्यांदा सॅफ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ सादर करत सामना थरारक केला. उपांत्य सामन्यातही पेनल्टी शूटआउटमध्येच बाजी मारताना भारताने लेबनॉनला ४-२ असे नमवले होते.श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही बरोबरी कायम राहिली. अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. यामध्ये भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगची भूमिका निर्णायक ठरली. पेनल्टी शूटआउटमध्येही दोन्ही संघांच्या पाच प्रयत्नानंतर ४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर सहाव्या प्रयत्नावर महेश सिंगने गोल करत भारताला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर कुवेतच्या खालीद इब्राहिमच्या किकचा अचूक अंदाज घेत गुरप्रीतने चेंडू यशस्वीपणे रोखला आणि भारताचे विक्रमी जेतेपद निश्चित झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉलIndiaभारत