कोथळीत महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:05+5:302021-01-13T05:01:05+5:30
कोथळी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीसाठी चार प्रभागांतून ११ जागांची निवडणूक लागली होती गावच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध करण्यात शेतकरी ...

कोथळीत महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी लढत
कोथळी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीसाठी चार प्रभागांतून ११ जागांची निवडणूक लागली होती गावच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध करण्यात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, शिवसेना यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये शरद केरबा पाटील, वैशाली दिलीप पाटील, सुनीता केदारी बुवा, प्रभाग क्रमांक दोनमधून महिपती शिवाजी कुंभार, प्रभाग क्रमांक तीन रुपाली विलास पाटील, प्रभाग क्रमांक चारमधून पद्मा सागर पाटील, मनीषा सागर टिपुगडे यांची बिनविरोध निवडून आले तर अन्य चार जागांसाठी अपक्ष उमेेेदवारासह ८ उमेदवार निवडून रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीचे नेतृत्व भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष के. बी. पाटील, जयदीप आमते, मोहन पाटील करत आहे.