शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
6
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
7
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
8
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
9
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
10
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
11
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
12
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
13
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
15
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
16
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
17
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
18
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
19
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
20
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 

कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:48 IST

कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांनी उत्साही वातावरणामध्ये भारतीय स्वातंत्रदिन साजरा केला. घरांच्या दारांमध्ये रांगोळ्या, तर शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये फुगे, फुले, आदींच्या माध्यमांतून आकर्षक तिरंगी सजा‌वट करण्यात आली होती. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने उत्साहात आणखी भर पडली. सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या संदेशांचा वर्षाव झाला.

ठळक मुद्देकोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांकडून स्वातंत्र्यदिन उत्साहातफुगे, रांगोळीने आकर्षक सजावट : सोशल मीडियावर संदेश

कोल्हापूर : कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांनी उत्साही वातावरणामध्ये भारतीय स्वातंत्रदिन साजरा केला. घरांच्या दारांमध्ये रांगोळ्या, तर शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये फुगे, फुले, आदींच्या माध्यमांतून आकर्षक तिरंगी सजा‌वट करण्यात आली होती. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने उत्साहात आणखी भर पडली. सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या संदेशांचा वर्षाव झाला.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा करताना नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगसह काही मर्यादांचे पालन करावे लागले. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिला. विविध शासकीय आणि खासगी कार्यालये, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, शाळा, महाविद्यालयांमध्ये मर्यादित लोकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. मर्यादा असल्या तरी नागरिकांनी आपल्या पद्धतीने उत्साहीपणे स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यात घरे, कार्यालये रांगोळी, लहान झेंडे, फुग्यांनी सजविण्यात आली होती.

सार्वजनिकरीत्या जिलेबी, मिठाईचे वाटप करता आले नाही. त्यामुळे शहरात दरवर्षीपेक्षा जिलेबी विक्रीचे स्टॉल कमी होते. ज्या ठिकाणी स्टॉल होते, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकांनी जिलेबी, मिठाई खरेदी केली. कोरोनामुळे भेटीगाठी टाळून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी रात्रीपासून सोशल मीडियावर संदेशांची गर्दी झाली.विविध वस्तूंची खरेदीस्वातंत्र्यदिनानिमित्त बाजार‌पेठेत टी. व्ही., स्मार्टफोन आणि त्यांच्या ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, फ्रिज, शिलाई मशीन, आदी विविध वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक योजना होत्या. त्यांची खरेदी काही नागरिकांनी केली.विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवलीकोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांमधील वर्ग अद्याप भरत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी येत नाहीत. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या विद्यार्थ्यांची शाळा आणि महाविद्यालयांमधील अनुपस्थिती जाणवली. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनkolhapurकोल्हापूर