सेवा रस्त्याची रुंदी वाढविल्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:25 IST2021-09-21T04:25:45+5:302021-09-21T04:25:45+5:30
कणेरी : पुणे-बंगलोर महामार्गावरील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सेवा रस्त्याची रुंदी वाढविल्याने येथे वारंवार होणाऱ्या अपघातांना ...

सेवा रस्त्याची रुंदी वाढविल्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत
कणेरी : पुणे-बंगलोर महामार्गावरील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सेवा रस्त्याची रुंदी वाढविल्याने येथे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे. सेवा रस्त्याची रुंदी कमी असल्याने अनेकवेळा येथे वाहने उलटून अपघात घडत होते. औद्योगिक वसाहतीत येणारे कंटेनर, अवजड वाहने यांना वाहन वळण्यासाठी अडथळा होत होता. याबाबत गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (गोशिमा) रस्त्याची रुंदी वाढविण्यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार केला होता. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार रस्ते विकास महामंडळ याची दखल घेऊन गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच सेवा रस्त्याची रुंदी वाढवली आहे.
फोटो : २० गोकुळ शिरगाव
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच सेवा रस्त्याची रुंदी वाढविल्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत होणार आहे.