शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची आवक वाढली; दर मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत. ढब्बू, गवार, दोडका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत. ढब्बू, गवार, दोडका या भाज्यांचे दर चढेच राहिले आहेत. टोमॅटोची आवक जास्त आहे. कडधान्य मार्केटमध्ये काहीसे थंडच आहे. फळ मार्केटमध्ये चिकू, सफरचंद, मोसंबी, हापूसची काहीसी रेलचेल पाहवयास मिळते.

मध्यंतरीचा आठ दिवसांचा लॉकडाऊन आणि त्यानंतर भाजीपाला विक्रीसाठी मिळत असलेला कमी कालावधीचा फटका भाजीपाला उठावाला बसला आहे. भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कोबी, टोमॅटो, ढब्बू, भेंडीची आवक अधिक दिसत आहे. एकूणच भाज्यांची आवक वाढली असली तरी दर मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर दिसत आहे. कोथिंबीरीची आवक वाढली असून रोज ३३ हजार पेंढ्याची आवक बाजार समितीत होती. घाऊक बाजारात आठ रुपये पेंढी असली तरी किरकोळ बाजारात पंधरा रुपये दर आहे. उन्हाळी भुईमूगाची काढणी सुरू असल्याने ओल्या शेंगाची आवक सुरू आहे. साधारणता २६ रुपये किलो दर राहिला आहे. मेथीची आवक कमी झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे.

कडधान्य मार्केट एकदम थंडच आहे. पावसाळ्याची बेगमी म्हणून गेली दोन महिने नागरिकांनी कडधान्य खरेदी केल्याने आता मागणी थोडी कमी आहे. तरीही दरात फारसा चढउतार दिसत नाही. हरभरा डाळ ७५, तूरडाळ ११०, मूग १००, मटकी ४० रुपये किलो आहे. सरकी तेल १६० तर साखर ३५ रुपये किलो आहे.

अननसची आवक वाढली

अननसचा हंगाम सुरू झाला असून आवकही हळूहळू वाढू लागली आहे. बाजार समितीत रोज २५ ते ३० डझन अननसची आवक होते. घाऊक बाजारात १०० ते ३५० रुपये डझनचा दर राहिला आहे.

हापूसचा हंगाम अंतिम टप्यात

हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्यात आहे. आवक मंदावली असून सध्या ८७५ पेटी तर ३५५० बॉक्सची आवक होते. अद्याप मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत.