शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 17:36 IST

सदृढ आरोग्यासाठी धावा अशी साद देत कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व होत आहे. त्यात सहभागी होण्याकरिता नावनोंदणी करण्यासाठी दिवसागणिक प्रतिसाद वाढत आहे. नोंदणी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत उरली आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी वाढता प्रतिसादनोंदणी करण्यासाठी दिवसाची मुदत

कोल्हापूर : सदृढ आरोग्यासाठी धावा अशी साद देत कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व होत आहे. त्यात सहभागी होण्याकरिता नावनोंदणी करण्यासाठी दिवसागणिक प्रतिसाद वाढत आहे. नोंदणी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत उरली आहे.कोल्हापूरची नवी ओळख असणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन,’ १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल.

सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्याना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. धावपटू आणि नागरिकांना उद्या, बुधवार(दि. २५ डिसेंबर)पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

धावपटूंना मिळणार रंगीत मेडलया महामॅरेथॉनमध्ये वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना सहभागी होता येईल. विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यंदाच्या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्टे असून, त्यामध्ये सहभागी होणाºया प्रत्येक धावपटूला आकर्षक आणि रंगीत मेडल मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा.

प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य

  • ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी सदृढ आरोग्याचा मंत्र प्र्रत्येकाने जपणे आज काळाची गरज आहे. ते लक्षात घेऊन मी स्वत: ‘फिटनेस’वर अधिक भर देतो. त्यासह आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत सजग करण्यासाठी विविध मॅरेथॉनमध्ये त्यांना सहभागी केले जाते. सदृढ आरोग्याबाबतची जाणीव करून देणारा ‘लोकमत’चा महामॅरेथॉन हा उपक्रम उल्लेखनीय आहे. यावर्षी आम्ही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहोत. मॅरेथॉनच्या माध्यमातून प्रत्येक घराघरांमध्ये आरोग्यदायी संदेश पोहोचतो.-शैलेश सरनोबत,प्लाँट हेड, इंडोकाऊंट इंडस्ट्रीज (होमटेक्सटाईल्स डिव्हीजन)

‘लोकमत महामॅरेथॉन’ हा उपक्रम कोल्हापूरकरांसाठी अविस्मरणीय आहे. या मॅरेथॉनचे नियोजन अचूक असते. त्यादिवशीचे वातावरण भारावून टाकणारे असते. व्यापारी, डॉक्टर, वकील असे विविध घटक या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. या मॅरेथॉनने कोल्हापूरची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.-भीखालाल पटेल, सचिव, श्री कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळ

मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारा स्पर्धक हा एक ध्येयाने प्रेरित असतो. म्हणूनच या महामॅरेथॉनमध्ये आम्ही सुरक्षितता आणि वीजबचत हा संदेश घेऊन आम्ही लोकमत मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहोत.-अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता, महावितरण

 

 

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमतkolhapurकोल्हापूर