इंग्रजी वाचणातून शब्दसंग्रह वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:21+5:302021-02-05T07:02:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : इंग्रजी विषय अवघड आहे म्हणून त्याचा बाऊ करून नका. अवांतर वाचन संभाषणात ...

इंग्रजी वाचणातून शब्दसंग्रह वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे :
इंग्रजी विषय अवघड आहे म्हणून त्याचा बाऊ करून नका. अवांतर वाचन संभाषणात शब्दाचा वापर करायला शिका. जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा संग्रह वाढविण्यासाठी इंग्रजी कादंबऱ्या, कथासंग्रह, तसेच इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन आवर्जून करावे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्रा. डॉ. एस. पी. कांबळे यांनी केले.
आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाअंतर्गंत ‘उत्कृष्ट इंग्रजी संभाषण कला’ या विषयावर प्रा. डॉ. एस. पी. कांबळे यांनी व्याख्यानही दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ ‘राहुरी’चे कार्यकारी परिषद सदस्य प्रा. एन. डी. चौगुले हे होते.
याप्रसंगी प्रा. आर. एस. पाटील, उपप्राचार्य व्ही. बी. तळेकर, प्रा. ए. ए. कांबळे, प्रा. ए. एम. व्हटकर, जनसंपर्क अधिकारी मुरलीधर कुलकर्णी, आदींसह प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती. प्रा ए. ए. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. जे. लगारे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. आर. एस. शेलार यांनी आभार मानले.