आजरा घनसाळचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:41+5:302021-02-05T07:03:41+5:30
आजरा : आजरा घनसाळ तांदळाला बाहेरील देशातून मागणी वाढत आहे. त्यामुळे त्याचा शुद्ध व पुरेसा पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय ...

आजरा घनसाळचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने वाढवा
आजरा :
आजरा घनसाळ तांदळाला बाहेरील देशातून मागणी वाढत आहे. त्यामुळे त्याचा शुद्ध व पुरेसा पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहन आजरा-चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केले. पोळगाव (ता. आजरा) येथे घनसाळ प्रशिक्षण व नोंदणीकृत घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ, राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार होत्या.
घनसाळला जी.आय.मानांकन मिळाल्यामुळे सर्व जगामध्ये आजरा घनसाळचे नाव झाले आहे. शेतकरी मंडळाने ग्राहकांना शुद्ध व पुरेसा घनसाळ तांदूळ देण्याचे सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. घनसाळ भात उत्पादक शेतकऱ्यांनी भारत सरकारकडे त्याची नोंदणी करणे गरजेचे आहे. सध्या चांगल्या उत्पादन वाढीची गरज आहे. परदेशात आजरा घनसाळ जाणार असल्याने यापुढे दरही चांगला मिळेल, असे अध्यक्षीय मनोगतात भाग्यश्री पवार यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविकात संभाजी सावंत यांनी शेतकरी मंडळाने आजरा घनसाळबाबत केलेली माहिती दिली.
कार्यक्रमास नामदेव नार्वेकर, राजू होलम, निवृत्ती कांबळे, वृषाली धडाम, आबा पाटील, गीता नाईक, रचना होलम, शिवाजी इंजल, आप्पा पावले, सी. आर. देसाई, रणजित देसाई, रामचंद्र पाटील, विलास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
-
* उसापेक्षा घनसाळपासून जादा पैसे
एका एकरात मिळणाऱ्या उत्पादनात घनसाळ भातामुळे ४२ हजार मिळतात, तर उसाला १८ हजार रुपये खर्च वजा जाता मिळतात. त्यामुळे उसापेक्षा शेतकऱ्यांनी घनसाळ भात उत्पादनाकडे वळावे, असे आवाहन शेतकरी मंडळाचे उपाध्यक्ष संताजी सोले यांनी केले.
-
* फोटो ओळी : आजरा घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करताना आमदार राजेश पाटील. शेजारी संभाजी साावंत, रचना होलम, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २८०१२०२१-गड-०१