शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पंचगंगेसह कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडीत दत्त मंदिराजवळ आले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 14:01 IST

शिरोळ-कुरुंदवाड जुना मार्ग वाहतुकीसाठी बंद

शिरोळ / कुरुंदवाड / नृसिंहवाडी : पावसाने जोर धरल्याने व पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस होत असल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे या नदीवरील शिरोळ तालुक्यातील तेरवाड व शिरोळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर येथील अनवडी पुलावर पंचगंगा नदीचे पाणी आल्याने शिरोळ-कुरुंदवाड जुना मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराजवळ कृष्णेचे पाणी आले आहे. दरम्यान, संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे पंचगंगेसह कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत असून, बुधवारी दुपारी राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुरूंदवाडचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी राजापूर बंधाऱ्याची पाहणी करून पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या.दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शिरोळ तालुक्यात पावसाची रिपरिप असल्याने शेतकरी सुखावला आहे. सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये, भात पिकांच्या पेरणीबरोबरच ऊस लागणीची लगबग सुरू झाली आहे. पावसामुळे शेतीची कामे एकदमच सुरू केल्याने शेतकऱ्यांना शेतमजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.नृसिंहवाडी येथील कृष्णेच्या पातळीत पाच फुटाने वाढ झाली असून, दत्त मंदिरासमोरील खालील कट्टयावर पाणी पोहोचले आहे. तर येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. येथील दत्त देव संस्थानने मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीDatta Mandirदत्त मंदिर