शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक!, कोल्हापूर जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल ४२ खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:56 IST

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

कोल्हापूर : खुन्नस दिली, दुचाकी आडवी मारली, शिवीगाळ केली, उसने घेतलेेले पैसे दिले नाहीत, गल्लीत दमदाटी केली अशा किरकोळ कारणांवरून एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात.. खून झाले, तर.. खुनाचे प्रयत्न झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा.. खून जास्त झाले आहेत, त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून माणसे एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे.

११ महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?खून : गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात.. खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली. कोल्हापूर शहरासह इचलकरंजीत खुनाच्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. यातील.. गुन्ह्यांची उकल झाली. बहुतांश खून किरकोळ कारणांतून झाले आहेत.खुनाचा प्रयत्न : जीवघेणा हल्ला करण्याचे .. गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी संशयित हल्लेखोरांवर कारवाया केल्या आहेत. खुनांप्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे वाढत आहेत.हाणामारीचे ३४० गुन्हे : कौटुंबिक वाद, शेजा-यांसोबत होणारे वाद, गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्ष, वर्चस्ववाद, किरकोळ कारणांवरून होणा-या मारामारीचे ३४० गुन्हे नोंद झाले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत वाढगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खून, खुनाचे प्रयत्न आणि मारामारीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी ११ महिन्यांत ५१ खून झाले, तर ५९ खुनाचे प्रयत्न झाले. मारामारीचे ३४६ गुन्हे नोंद झाले.या घटनांनी शहर हादरलेपाठलाग करून गुंडाचा खून : ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरच्या रात्री फुलेवाडी परिसरात सहा जणांनी पाठलाग करून गुंड ऋषीकेश रवींद्र नलवडे याचा धारदार शस्त्रांनी खून केला. त्याच्यावर तलवार, कोयता आणि एडक्याचे १६ वार केले होते.डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून : ऑक्टोबर महिन्यात जवाहरनगर येथे एका तरुणाने डोक्यात दगड घालून वृद्धेचा निर्घृण खून केला. मद्यप्राशन करीत असल्याचे घरात सांगितल्याच्या रागातून तो खून झाला होता.

किरकोळ कारण पुरेसेखून, मारामारी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांसाठी किरकोळ कारणे पुरेशी ठरत आहेत. टेंबलाईवाडी नाका परिसरातील झोपडपट्टीत केवळ रागाने पाहत असल्याच्या कारणावरून खून झाला होता. फुलेवाडी परिसरातील गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादातून शिवाजी पेठेत पाठलाग करून एकावर जीवघेणा हल्ला झाला. मुक्त सैनिक वसाहत परिसरात पूर्ववैमनस्यातून एका टोळीने दोन तरुणांना पाठलाग करून मारहाण केली. अशा घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस