शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गुन्हेगारांच्या संख्येत वाढ, गेल्या वर्षभरात वॉन्टेडच्या यादीत ६० जणांची भर; पानसरे हत्येतील आरोपी मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 14:45 IST

केवळ २१ गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश

उद्धव गोडसेकोल्हापूर : विविध प्रकारचे गुन्हे करून परागंदा होणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आणि पाहिजे असलेले असे ६९८ गुन्हेगार असून, यात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांसह अवैध व्यवसाय चालवणाऱ्या सूत्रधारांचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरात वॉन्टेडच्या यादीत ६० गुन्हेगारांची भर पडली, तर केवळ २१ गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. घरफोड्या, चोऱ्या, अवैध व्यवसाय, मद्य तस्करी, मारामारी अशा गुन्ह्यांमधील काही सराईत गुन्हेगारही वर्षानुवर्षे पोलिसांच्या वॉन्टेड यादीत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.नव्याने ६० गुन्हेगारांची भरवॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत गतवर्षी ६० गुन्हेगारांची भर पडली. त्यामुळे एकूण फरार आणि पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची संख्या ६९८ झाली. यात फरार असलेले ४१, तर वॉन्टेड असलेल्या ६५७ गुन्हेगारांचा समावेश आहे. बहुतांश गुन्हेगार घरफोड्या, फसवणूक, मारामारी आणि अवैध व्यवसायांमधील आहेत.पानसरे हत्येतील आरोपी मोकाटचकॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी १२ संशयितांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यापैकी १० संशयित अटकेत आहेत, तर सारंग आकोळकर आणि विनय पवार हे दोघे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. गेल्या आठ वर्षांपासून विविध तपास यंत्रणांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

कोराणे, सावलाचाही शोध सुरूमटका आणि जुगार अड्डे चालवणारे सम्राट कोराणे, पप्पू सावला, सुनील तेलनाडे या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतरही ते पोलिसांना सापडलेले नाहीत. जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्यांचे सूत्रधारच हे आरोपी असल्यामुळे त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.पोलिसांसमोरील आव्हानेअनेकदा फिर्यादींची नोंद होताना संशयितांची बोगस आणि चुकीच्या नावांची नोंद होते. आरोपींचा नेमका पत्ता उपलब्ध नसतो. आरोपी सतत स्वत:चे ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देतात. त्यामुळे वॉन्टेड आरोपी पकडण्यात अडचणी येत असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात.२१ गुन्हेगारांना अटकगतवर्षी फरार आणि पाहिजे असलेल्या ६९८ गुन्हेगारांपैकी केवळ २१ गुन्हेगारांना अटक करण्यात अपयश आले. वॉन्टेडपैकी १९, तर फरार असलेले दोन गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. यातील १२ आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले.

वॉन्टेड, फरार आरोपीआरोपी - संख्याजिल्ह्यातील - २४७परजिल्ह्यांतील - २२३परराज्यांतील - २२३परदेशातील - ५

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यास प्राधान्य दिले जात आहे. परजिल्ह्यांतील आणि राज्याबाहेरील वॉन्टेड गुन्हेगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अटकेतील गुन्हेगारांची संख्या कमी दिसते. - शैलेश बलकवडे - पोलिस अधीक्षक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस