शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime News: किरकोळ झाला वाद... तरी थेट पाडतात मुडदा, ६२ खून; इचलकरंजी परिसर गुन्ह्यांचा हॉटस्पॉट

By उद्धव गोडसे | Updated: March 11, 2026 12:05 IST

पोलिसांचा धाक कमी झाला आहे की अर्थपूर्ण घडामोडींमुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात? 

उद्धव गोडसेकोल्हापूर : रागाने पाहिले, दुचाकी आडवी मारली, आईवरून शिवी दिली, उसने घेतलेले पैसे परत दिले नाहीत... अशा किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादात थेट मुडदे पाडण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यात ६२ खून झाले. यातील बहुतांश गुन्ह्यांच्या मुळाशी क्षुल्लक कारणे आहेत. त्यामुळे क्षणिक राग तरुणाईचे करिअर उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. विशेषत: इचलकरंजी परिसर गंभीर गुन्ह्यांचा हॉटस्पॉट बनत आहे.राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात खुनांचे प्रमाण काहीसे कमी आहे. कोल्हापूर शहरात खुनाच्या घटना कमी घडतात. याउलट इचलकरंजी, तारदाळ, कबनूर, यड्राव या परिसरात खुनाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव या औद्योगिक पट्ट्यातही खुनांचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश खून पूर्ववैमनस्यातून होतात. पूर्वीच्या वादाचा राग डोक्यात ठेवून दोन गट आमने-सामने येताच संघर्षाची ठिणगी पडते. यातून गेल्या १४ महिन्यांत पूर्ववैमनस्यातून १८ खून झाले. आर्थिक वादातून १०, चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून प्रत्येकी चार खुनांची नोंद झाली. आईवरून शिवी दिली, रागाने पाहिले, शेताची वाट अडवली अशा किरकोळ कारणांतूनही थेट मुडदे पाडण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढत आहेत. कोल्हापुरातील राजेंद्रनगर, टेंबलाईवाडी यासह इचलकरंजी, गांधीनगर येथील काही घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग आढळला. झोपडपट्ट्यांमध्ये तर अवघी तरुणाई असा गंभीर गुन्ह्यांमध्ये गुरफटली आहे. त्यामुळे येणा-या काळात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.वर्ष - खून२०२३ - ६२२०२४ - ५८२०२५ - ५१२०२६ - १२

गुन्हेगारीचे उदात्तीकरणशहरासह जिल्ह्यातील काही गुंडांच्या टोळ्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत आहेत. गुंडांचे फलक प्रमुख चौकांमध्ये लागतात. सोशल मीडियातून त्यांच्या रिल्स व्हायरल होतात. गेल्या आठवड्यात तर बाल निरीक्षण गृहातून सुटका होताना एका अल्पवयीन गुन्हेगाराचे रिल्स व्हायरल झाले होते. यातून होणारे उदात्तीकरण गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

धाक कमी झाला?तडीपारीच्या कारवाईचे उल्लंघन करून अनेक गुन्हेगार शहरात वावरत आहेत. ताराराणी चौक परिसरात कुचकोरवी टोळीतील पाच ते सहा तडीपार गुन्हेगारांनी शहरात जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. तरीही पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे की अर्थपूर्ण घडामोडींमुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime Surge: Trivial Disputes Lead to Murders; Ichalkaranji a Hotspot

Web Summary : Kolhapur sees rising murders over petty issues. Ichalkaranji is a crime hotspot. Most killings stem from old rivalries, financial disputes, and family conflicts. Youth involvement is increasing, fueled by glorification of crime.