‘टेक आॅफ’बरोबर विस्तारही वाढावा
By Admin | Updated: July 31, 2014 00:47 IST2014-07-31T00:40:07+5:302014-07-31T00:47:39+5:30
कोल्हापूर विमानतळ : लोकप्रतिनिधी, उद्योजकांचा पुढाकार; नियमित विमानसेवेसाठी ‘सुप्रीम’ तयार

‘टेक आॅफ’बरोबर विस्तारही वाढावा
संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर
विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया, धावपट्टीची दुरुस्ती, विमान कंपन्यांनी खंडित केलेली सेवा अशा कारणांमुळे गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरची विमानसेवा बंदच आहे. त्याचा जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक आणि उद्योजकांनी पुढाकार घेतला. सेवा देण्यासाठी विमान कंपनीनेदेखील तयारी दर्शविली आहे. महिन्याभरात कोल्हापुरातून विमानाचे ‘टेक आॅफ’ होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
‘लोकमत’ने ‘आता बस्स’ मोहिमेच्या माध्यमातून कोल्हापूर विमानतळाची सद्य:स्थिती, बंद असलेल्या विमानसेवेचा जिल्ह्याच्या विकासावर होणारा परिणाम आणि नियमित सेवा सुरू होण्यासाठी आवश्यक असलेले मुद्दे मांडले होते. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी विमानतळ सुरू होण्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न व उद्योजकांची भूमिका लक्षात घेऊन, निश्चित प्रवासी संख्येची अट घालून मुंबईतील सुप्रीम एअरवेज या विमान कंपनीने ‘कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर’ अशी नियमित सेवा देण्यासाठी तयारी दाखविली. यानंतर आता विमानतळ विस्तारीकरणाच्या दिशेनेदेखील वेगाने पावले पडण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधींचा पुढाकार
उद्योग-व्यापार, आदी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दिल्ली व मुंबईतील अधिकारी तसेच सुप्रीम एअरवेज या विमान कंपनीशी खासदार धनंजय महाडिक यांनी चर्चा केली. तसेच त्यांनी त्यासाठी आवश्यक प्रवासी संख्येच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील औद्योगिक, व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. तसेच केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री अशोक राजू यांना कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी निवेदन देऊन केली.
सोयीस्कर सेवा
‘सुप्रीम’द्वारे सकाळी सात वाजता कोल्हापुरातून मुंबईला विमान जाईल. सायंकाळी पाच वाजता ते मुंबईतून कोल्हापूरला परत येईल. विमानतळावर उड्डाणाच्या १५ मिनिटांपूर्वी चेक आउट करता येईल. जुहू (मुंबई)मध्ये विमान उतरणार आहे. या स्वरूपातील सेवा उद्योजक, व्यावसायिकांसाठी उपयुक्त आणि सोयीस्कर ठरणारी आहे.
250 कोटींची तरतूद करण्याची ग्वाही
कोल्हापूर हे दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील उद्योग व अन्य व्यवसाय, पर्यटनाच्या विकासासाठी नियमित विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी या विमानतळाचे विस्तारीकरण, धावपट्टीची लांबी वाढविणे, नाईट लँडिंग व अन्य सुविधा पुरविण्याची आवश्यकता, आदींबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यमंत्री अशोक राजू यांच्याशी जुलैच्या पहिल्या आठवड्यात चर्चा केली. तसेच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली होती. त्यावर कोल्हापूर विमानतळासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याचे मंत्री अशोक राजू यांनी सांगितले. त्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री जी. एम. सिद्धेवरा यांनी ‘लो कॉस्ट’ विमानतळांमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश करण्याची घोषणा लोकसभेत केली.
उद्योजकांनी घेतली जबाबदारी
विमान कंपनीने घातलेली प्रवासी संख्येची अट पूर्ण करण्यासाठी असोसिएशननिहाय प्रत्येकी एक प्रवासी निश्चित करणे,
रोज चार प्रवासी देण्याची जबाबदारी उद्योजक आणि व्यावसायिकांनी घेतली.
उद्योजक, व्यावसायिकांच्या अपेक्षा
कोल्हापुरातून नियमितपणे विमानसेवा सुरू व्हावी. येथून सकाळी सात वाजता जाणारी व मुंबईमधून रात्री आठ वाजता येणारी ‘फ्लाइट’ असावी, अशा उद्योजक, व्यावसायिकांच्या अपेक्षा मांडल्या होत्या. कारण नियमित विमानसेवा सुरू असणे हे शहराच्या औद्योगिक वाढीचे लक्षण मानले जाते. तसेच विशेषकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर दळणवळणासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरते.
जबाबदारी कोणाची ?
स्थानिक लोकप्रतिनिधी, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकीय संघटना यांच्यावर खऱ्या अर्थाने विमानतळ विस्तारीकरण व विकासाची जबाबदारी आहे. त्यांनी एकत्रितपणे येऊन त्यासाठी प्रयत्नशील होणे आवश्यक असल्याचे मत मांडले होते.
पाठपुराव्याची कमतरता
विमानसेवा सुरू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत असल्याचे विविध कार्यक्रम, प्रसंगांवेळी सांगतात. मात्र, प्रत्यक्षात काही विमानसेवा सुरू झालेली नाही. यातील काहींनी पत्राद्वारे, तर काहींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. विमानसेवा सुरू होत नाही, याचा अर्थ संबंधित लोकप्रतिनिधींचा पाठपुरावाच कमी पडत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते.
राष्ट्रीय दर्जासह विस्तारीकरण
जुलैमध्ये देशातील ५१ विमानतळ विकसित करण्याची घोषणा शासनाने केली. त्यानंतर कोल्हापूर विमानतळाचे हस्तांतरण झाले. ते करताना कोल्हापूर विमानतळाचा विकास भारतीय विमानतळ प्राधिकरणाने स्वनिधीतूनच तीन वर्षांत करावा, अशी सूचना महाराष्ट्र शासनाने केली. सोलापूर विमानतळाचा विकास राज्य शासनाची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व केंद्रीय प्राधिकरण यांनी संयुक्त कंपनी (जॉइंट व्हेंचर) स्थापन करून केला जाईल; पण कोल्हापूर विमानतळ स्वखर्चातून विकसित करण्यास तयार