विरळे येथे कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST2021-05-29T04:18:34+5:302021-05-29T04:18:34+5:30
बौद्धवाडीतील ९१ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये सध्या १५ ...

विरळे येथे कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ
बौद्धवाडीतील ९१ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये सध्या १५ रुग्ण उपचार घेत असून ९ रुग्ण उपचार घेऊन आपल्या घरी परतले आहेत. तर आतापर्यंत कोरोनाच्या या लाटेत एका महिला रुग्णाचा मृत्यूू झाला आहे.
विरळे ग्रामपंचायत, कोरोना दक्षता व सनियंत्रण समितीमार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तो विभाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला असून निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात येत आहे.