शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभाग, भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष; २७ तरुणांना घातला दीड कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 12:36 IST

मुलांच्या पालकांनी कर्जे काढून रक्कम दिली आहेत. मात्र नोकरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांची गाळण उडाली आहे.

कुरुंदवाड : आयकर विभागात आणि भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोलकत्ता येथील रुद्रकुमार व सुबोधकुमार या अनोळखी दोन व्यक्तींनी शहरासह कोल्हापूर जिल्हयातील २७ तरुणांना सुमारे  दीड कोटीचा गंडा घातला आहे. आनंदा गणपती करडे (रा. कुरुंदवाड ता. शिरोळ)  यांनी आपल्या दोन पाल्यासह इतर २५ जणांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पोलिस प्रमुखासह येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून शहरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक झाल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तक्रार अर्जात करडे यांनी आपल्या दोन मुलांना आयकर विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून वेळोवेळी ६१ लाख ५० हजार रुपये रुद्रकुमार याला दिले आहेत. ही रक्कम बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, आरबीएल व कँनरा बँकेत रुद्रकुमार याने दिलेल्या खात्यावर भरले आहे.शिवाय आर्मीमध्ये नोकरी लावतो असे सांगून सुबोधकुमार (कोलकत्ता) याने करडे याच्यासह इतर २५ जणांकडून ७१ लाख ४९ हजार रुपये उकळले आहेत. त्यातील ४० लाख ७४ हजार रुपये अँक्सेस, आयडीबीआय आणि आयसीआयसीआय बँकेत भरणा केला असून ३० लाख ७५ हजार रोखीने दिले आहे. २५ जुलैपासून दोघांचेही फोन बंद लागत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.फसवणूक करणार्‍या दोघा व्यक्तींनी मुलांना ट्रेनिंगसाठी, परीक्षेसाठी दिल्ली, बेंगलोर दानापूर (बिहार), सिकंदराबाद, हैद्राबाद येथे बोलावून फसगत केली असल्याचे नमूद केले आहे.  पालकांनी कर्ज काढून दिले पैसेफसवणूक झालेल्यांमध्ये शहरासह शिरोळ, कोल्हापूर , गडहिंग्लज आदी भागातील तरुण आहेत. मुलांच्या पालकांनी कर्जे काढून रक्कम दिली आहेत. मात्र नोकरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांची गाळण उडाली आहे. मोठी आर्थिक फसवणूक असल्याने पोलिसांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे मार्गदर्शन मागविले असून अनोळखी व्यक्तीला शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस