शाहूपुरीसह तीन ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:07+5:302021-01-22T04:21:07+5:30
कोल्हापूर : शाहूपुरीसह राजारामपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या असून याची नोंद संबंधित ...

शाहूपुरीसह तीन ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना
कोल्हापूर : शाहूपुरीसह राजारामपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या असून याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झाली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिख पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी केलेली दुचाकी सोमवारी (१८) रात्री अज्ञाताने लांबविली. याबाबतची तक्रार आकाश उत्तम कदम (२७, रा. सरनाईक वसाहत )यांनी पोलिसांत दिली. तर राजारामपुरी हद्दीतील विक्रमनगरातील नवदुर्गा गल्लीमध्ये एका घराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी १३ ते १४ जानेवारीच्या दरम्यान उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबविली. या बाबतची तक्रार उमेश मारुती नाईक ( ३४, रा. विक्रमनगर ) यांनी दिली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती संभाजी क्रीडा संकुल संभाजीनगर जुने एनसीसी ऑफिसजवळ बुधवारी सायंकाळी उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली. याबाबतची तक्रार मनीषा शिवाजी गायकवाड (रा. मंगंळवार पेठ ) यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.