विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:35+5:302021-02-05T07:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी कृती समिती संचलित विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्री ...

विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी कृती समिती संचलित विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत-मांडरे, मंदार पाटील, मंजीत माने, डॉ. रोहित कोळेकर, डॉ. आर. जी. कोरबू, अनिल घाटगे उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचा सत्कार शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक प्रवीण कोडोलीकर यांच्या हस्ते झाला.
विद्यार्थी सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक व संस्था यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. मीदेखील शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे मला याचा सार्थ अभिमान आहे. या केंद्रातून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी सर्व सहकार्य करेन, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली. यावेळी आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
विवेक कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. योगिता कोडोलीकर यांनी आभार मानले.
२९०१२०२१-कोल-कोडोलीकर न्यूज
शिवाजी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी कृती समिती संचलित विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.