शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

वैद्यकीय शिक्षण विभागाला उठवलं, चालवलं, पळवलं - मंत्री हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:36 IST

शेंडा पार्क येथे सीपीआरमधील एमआरआय, सीटीस्कॅनसह मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण

कोल्हापूर : माझ्यासाठी आमचे नेते अजित पवार यांनी सहकार खाते मागून घेतले होते. परंतु, मी वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आग्रही राहिलो. या खात्याच्या माध्यमातून या विभागाला मी उठवलं, चालवलं आणि पळवलं, अशी प्रतिक्रिया राज्यभरातून येत आहे. याच पध्दतीने काम करत येथील सीपीआरचे ३०० कोटी रुपये खर्चून सुरू असलेले नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्रीहसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.शेंडा पार्क येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी यांच्यासह आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते सीपीआरमधील एमआरआय, सीटीस्कॅनसह मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले.मुश्रीफ म्हणाले, देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शेंडा पार्कमधील काम सर्वांत वेगवान पध्दतीने सुरू आहे. यापुढे आमच्या रूग्णालयांमध्ये जितक्या महागड्या सेवा देणार आहोत, त्यासाठी ‘पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशीप’ धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणा सुसज्ज राहतील. शासकीय दराने जे डॉक्टर या सुविधा देतील, त्यांच्याकडे ही सेवा सोपवली जाईल. कॅन्सर रुग्णालयासाठीही धोरण आणण्यात आले असून, कोल्हापूरचे वैद्यकीय महाविद्यालय हे दुसऱ्या क्रमांकाच्या वर्गवारीत बसविण्यात आले आहे.आमदार अमल महाडिक म्हणाले, दिग्विजय खानविलकर यांनी हे महाविद्यालय आणले. गिरीश महाजन यांनी त्यांच्या काळात सीपीआरसाठी ६०० कोटी रुपये दिले. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अतिशय वेगवान पध्दतीने या विभागाला गती दिली. सर्वसामान्यांसाठी आरोग्य क्षेत्रात कसं काम करावं हे मंत्री मुश्रीफ यांच्याकडून मी शिकलो. आदिल फरास म्हणाले, रुग्णसेवा करून जनतेचा आशीर्वाद घ्या, ही हसन मुश्रीफ यांची शिकवण मोलाची मानून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते समाजकारणात सक्रिय आहेत.डॉ. गिरीष कांबळे यांनी स्वागत केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी आभार मानले. यावेळी युवराज पाटील, भैय्या माने, महेश सावंत, रोहित तोंदले उपस्थित होते. अनिकेत जाधव, हर्षद शहा, सोहेल अहमद या कंत्राटदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.आरोग्यमंदिराचा जीर्णोध्दारखानविलकर यांनी स्थापन केलेल्या या सीपीआरकडे २००५नंतर दुर्लक्ष झाले. आमदार अमल महाडिक यांनी मध्यंतरी खूप प्रयत्न केले. परंतु, भग्नावस्थेत चाललेल्या या आरोग्यमंदिराचा जीर्णोध्दार करण्याचा विडा मंत्री मुश्रीफ यांनी उचलला आणि हे काम वेगाने सुरू असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी यावेळी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif claims to have revitalized medical education department in Maharashtra.

Web Summary : Minister Hasan Mushrif highlights the ongoing renovation of CPR hospital with ₹300 crore. Modern facilities were inaugurated, and future plans for affordable healthcare through public-private partnerships are underway. MLA Mahadik praised Mushrif's work ethic.