शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कळंबा कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे ‘राणा-अंजली’च्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:57 IST

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजलीची भूमिका बजावलेला अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कैद्यांच्या हस्तकलेतुन तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळीच्या फराळासह आकशदिवे, पणत्या, कपडे, लाकडी खुर्चा, खेळणी आदींचा समावेश आहे. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्देकळंबा कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे ‘राणा-अंजली’च्या हस्ते उद्घाटनकैद्यांची मेहनत पाहून भारावले, दिवाळी फराळासह विविध वस्तुंची विक्री

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजलीची भूमिका बजावलेला अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कैद्यांच्या हस्तकलेतुन तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळीच्या फराळासह आकशदिवे, पणत्या, कपडे, लाकडी खुर्चा, खेळणी आदींचा समावेश आहे. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी त्यांचे स्वागत केले.कारागृहातील कैद्यांचे जीवन आणि याठिकाणी कैद्यांवर घडविले जाणारे संस्काराचे त्याने कौतुक केले.जीवनात कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण बंदी विविध कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहात घालविल्यामुळे शिक्षा भोगून कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कुटुंबाच्या व स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काय काम करायचे; रोजगार मिळेल का, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तसेच समाज कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या व्यक्तीस सहजासहजी मुख्य प्रवाहात सामावून घेण्यास इच्छुक नसतो; कारण ‘अपराधी’ या भावनेने त्याच्याकडे पाहिले जाते.

अशा काळात कारागृहातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, समाजाने त्याचा पुन्हा एक माणूस म्हणून स्वीकार करावा; समाजाच्या मुख्य प्रवाहात अभिमानाने सामील होऊन त्याला उर्वरित जीवन सुखाने व्यतीत करता यावे; त्याच्या स्वत:च्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कारागृहात कौशल्य शिक्षण मिळायला हवे, या उद्देशाने कळंबा कारागृह प्रशासनाने बंदीजनांसाठी नऊ उद्योग सुरू केले आहेत. त्याकरिता लागणारी यंत्रे व साधनसामग्री उपलब्ध केली आहे.

फौंड्री, सुतार, लोहार, जरीकाम, टेलरिंग, कापडनिर्मिती, हातमाग, रंगकाम, बेकरी आदी विविध प्रकारचे उद्योग सुरू करून कळंबा कारागृहाने राज्यात नावलौकिक मिळविला आहे. ६०० बंदीजनांच्या हातून बनलेल्या आकर्षक वस्तूं दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी विक्रीकेंद्रात ठेवल्या आहेत.

या स्टॉलचे उद्घाटनासाठी अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर कारागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजता आले. त्यांच्या स्वागतासाठी कारागृह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी केली होती. त्यांनी कारागृहात कशाप्रकारे वस्तु तयार केल्या जातात त्याची प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली. त्यानंतर या दोघांच्या हस्ते स्टॉलचे उद्धाटन करण्यात आले. कारागृहाबाहेर आल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यासोबत मोबाईलवर सेल्फी घेतले.राणा-अंजली भारावलेअंबाबाईचा लाडू प्रसाद बनविणाऱ्या महिला कैद्यांशी राणा-अंजली यांनी संवाद साधला. लाडूची चवही चाखली. बेकरी, पणत्यावर नक्षीकाम करणाऱ्या तसेच मशीन विभागात काम करणाºया कैद्यांची मेहनत पाहून दोघेही भारावून गेले. 

 

टॅग्स :Hardik Joshiहार्दिक जोशीjailतुरुंगkolhapurकोल्हापूर