चरणाईदेवी महिला पतसंस्था उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:09+5:302021-03-24T04:22:09+5:30
बांबवडे : चरणाईदेवी महिला ग्रामीण पतसंस्था, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष एस. के. ...

चरणाईदेवी महिला पतसंस्था उद्घाटन
बांबवडे : चरणाईदेवी महिला ग्रामीण पतसंस्था, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष एस. के. पाटील यांनी केले. चरण येथे पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाहूवाडीचे सहायक उपनिबंधक सुजय यगरे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र स्वीकारण्यात आले.
यावेळी एस.के. पाटील म्हणाले की, महिलांचे सबलीकरण व्हावे, त्यांनी संस्थेच्या माध्यमातून लघुउद्योजक बनावे व आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा हा उदात्त हेतू समोर ठेवून संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी सहकार अधिकारी अविनाश लाड, बंगसुळे, वसुली अधिकारी उदय पाटील, ब्रह्माकुमारीज बांबवडेच्या अधीक्षक संगीता बहनजी, संचालक ओंकार पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
२३ चरणाई महिला संस्था
फोटो - चरणाईदेवी महिला पतसंस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र देताना विजय यगरे, अविनाश लाड, ओंकार पाटील इत्यादी.