शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Vidhan Sabha 2024: भाजप ‘दक्ष’, पश्चिम महाराष्ट्र ‘लक्ष्य’

By समीर देशपांडे | Updated: September 25, 2024 11:51 IST

पाच जिल्ह्यांत ५८ पैकी १७ आमदार, संख्या वाढवण्यासाठी नियोजन

समीर देशपांडे कोल्हापूर : गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा वारू रोखण्यात पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. अंतर्गत मतभेद आणि अन्य कारणांमुळे भाजपला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. भाजपचा मुख्यमंत्री असतानाही ५८ पैकी केवळ १७ ठिकाणी भाजपने बाजी मारली होती. ही संख्या वाढवण्याचे ‘लक्ष्य’ ठेवून भाजप ‘दक्ष’ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी महासैनिक दरबार हॉलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे.ज्या जिल्ह्यात हा मेळावा होत आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यात १० पैकी एकही आमदार भाजपचा नाही. सांगली आणि सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी आठपैकी केवळ दाेन, दोन आमदार भाजपचे आहेत. पुण्यात २१ जागांपैकी ८ ठिकाणी भाजपचा विजय झाला होता. तर सोलापूर जिल्ह्यात भाजपची कामगिरी चांगली झाली होती. तेथे ११ पैकी पाच ठिकाणी भाजपला विजय मिळवता आला होता. अशा पद्धतीने ५८ पैकी १७ ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता.त्यावेळी सर्व जागा भाजपने लढवल्या होत्या. मात्र, आता महायुती म्हणून लढाई असल्याने आकडेमोड वेगळ्या पद्धतीने करावी लागणार आहे. या १७ ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील; परंतु अन्य ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जागा द्याव्या लागणार असून, काही अधिक जागा भाजप पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.सध्या राज्यात महायुतीमध्ये भाजप थोरला भाऊ आहे. त्यामुळेच केवळ भाजपचे उमेदवार जिंकणे नव्हे, तर पुन्हा सत्ता येण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा विजय महत्त्वाचा आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे अजूनही काही ठिकाणी असलेली नाराजी दूर करून आपली सत्ता येण्यासाठी किंतु-परंतु मनात न आणता कामाला लागा, हे सांगण्यासाठीच अमित शहा येत आहेत असे मानले जाते.

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची सद्य:स्थितीजिल्हा -  एकूण विधानसभा जागा - भाजपचे आमदारकोल्हापूर  -  १०  - ००सांगली - ०८  - ०२सातारा - ०८  - ०२सोलापूर - ११  - ०५पुणे  - २१  - ०८एकूण  - ५८ - १७

जनसुराज्य, ताराराणीचे काय?जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे आणि ताराराणी आघाडीचे संस्थापक आमदार प्रकाश आवाडे हे दोघेही महायुतीसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपला त्यांच्या पाठीशी राहावे, लागणार आहे. त्यांना भाजपसोबत घेण्याचाही मध्यंतरी प्रस्ताव होता. याबाबतही आज बुधवारी चर्चा होऊ शकते.

हे नेते राहणार उपस्थितकेंद्रीय मंत्री भूपेंद्र शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक.

असा आहे शाह यांचा दौरादुपारी ३:३० वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन४:०५ वाजता अंबाबाई दर्शन४:२० महासैनिक दरबार हॉल आगमन६:०५ पर्यंत भाजप पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती६:३० वाजता कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीला रवाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाAmit Shahअमित शाह